विधानसभा निवडणूक २०२४;अंतर्गत सर्वेक्षणाने भाजपची झोप उडाली
Assembly election 2024; Internal survey has lost sleep of BJP

लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून मार खाणाऱ्या भारतीय जनता पक्षाला विधानसभा निवडणुकीतही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये शंभरी ओलांडत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपची चिंता अंतर्गत सर्वेक्षणामुळे वाढली आहे.
लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही भाजपला मोठं नुकसान होण्याची शक्यता सर्वेमधून वर्तवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात केवळ ९ जागा मिळाल्या.
भाजपच्या मदतीनं आपण पुन्हा सत्तेत येऊ याची खात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाटते. पण भाजपची चिंता अंतर्गत सर्वेक्षणामुळे वाढली आहे.
भाजपला विधानसभा निवडणुकीत केवळ ५५ ते ६५ जागा मिळू शकतात, असा सर्वेक्षणाचा अंदाज आहे. २०१४ मध्ये भाजपनं राज्यात १२२ जागा जिंकल्या होत्या.
त्यावेळी भाजप स्वबळावर लढला होता. तर २०१९ मध्ये शिवसेनेसोबत युतीत लढलेल्या भाजपनं १०५ जाागांपर्यंत मजल मारली होती.
पण यंदा भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आता भाजपची सर्व मदार सरकारी योजना आणि मतांच्या ध्रुवीकरणावर आहे.
लोकसभेतील कामगिरी पाहता अजित पवार गटात मोठी अस्वस्थता आहे. त्यामुळे त्यांचे अनेक आमदार शरद पवारांकडे जाऊ शकतात. तसे प्रयत्नही अनेकांनी सुरु केले आहेत.
तर लोकसभा निवडणुकीतील कामगिरीमुळे भाजप कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम झाला आहे. अजित पवारांसोबतच्या हातमिळवणीचा फटका पक्षाला बसल्याचं,
त्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाल्याचं विश्लेषण संघाशी संबंधित नियतकालिकांनी केलेलं आहे. ऑबझर्व्हर आणि विवेकनं अजित पवारांसोबतच्या युतीचा
भाजपला नेमका कसा फटका बसला, यावर प्रदीर्घ लेख लिहिले आहेत.तू राहा नाहीतर मी राहिन; फडणवीसांसाठी उद्धव ठाकरेंच्या तोंडून हे शब्द निघणं योग्य नाही : गुलाबराव पाटील
भाजपच्याच नेत्यांनी अजित पवारांवर सिंचन प्रकल्पांमध्ये ७० हजार कोटींचा घोटाळ्याचे आरोप केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील यावरुन अजित पवारांवर शरसंधान साधलं होतं.
त्यानंतर त्याच अजित पवारांशी भाजपनं हातमिळवणी केली. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांची गोची झाली. ज्यांच्याशी तात्त्विक पातळीवर संघर्ष केला,
त्यांच्याशीच युती करण्याचा निर्णय भाजप, संघाच्या कार्यकर्त्यांना अनैतिक वाटल्याचं विश्लेषण ऑबझर्व्हर आणि विवेकनं केलं आहे. भाजपनं अजित पवारांसोबतची युती तोडावी यासाठी संघाकडूनच दबाव टाकला जाऊ लागल्याची चर्चा आहे.