विधानसभेसाठी महायुतीने प्लॅन आखला, ‘सागर’ बंगल्यावर हालचाली वाढल्या

Mahayuti made a plan for the assembly, movement increased at the 'Sagar' bungalow

 

 

 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. कारण आगामी निवडणूक ही महायुतीच्या नेत्यांसाठी फार महत्त्वाची असणार आहे.

 

 

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून सर्वोतोपरी प्रयत्न केला जात आहे.

 

विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची समन्वय समिती बनवण्यात आली आहे.

 

भाजप आमदार प्रसाद लाड या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीची आज मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीला महायुतीमधील

 

आमदार प्रसाद लाड, अनिकेत तटकरे, सचिन जोशी, उदय सामंत, योगेश टिळेकर, अजित गोपछडे, संजय खोडके हे नेते उपस्थित होते.

 

महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीनंतर प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली. “आजच्या समन्वय समितीच्या बैठकीत तीनही पक्षाचे सदस्य उपस्थित होते.

 

उद्याच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील. विधानसभा निवडणुकीतील दौऱ्यासाठी या बैठकीत चर्चा झाली.

 

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सभा होईल आणि या सभा होत असताना महायुती सक्षमपणे लढेल”, असं प्रसाद लाड म्हणाले.

 

दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावर मुंबई महानगरातील आमदारांची बैठक बोलावली आहे.

 

 

देवेंद्र फडणवीस हे मुंबई महानगरातील आमदारांसोबत आज चर्चा करणार आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फडणवीस मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत.

 

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर मतदारसंघातील आमदारांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवाद साधणार आहेत.

 

 

या बैठकीसाठी आमदार गणेश नाईक, श्रीकांत भारती, महेश चौगुले, कालिदास कोलंबकर, विद्या ठाकूर, संजय केळकर, कुमार आयलानी, मनीषा चौधरी, पराग अलवाणी, प्रवीण दरेकर,

 

भारती लव्हेकर, अमित साटम, प्रसाद लाड, मंगल प्रभात लोढा, अतुल भातखलकर, योगेश सागर, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, निरंजन डावखरे हे आमदार ‘सागर’वर दाखल झाले आहेत.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची उद्या सयुंक्तपणे वर्षा या निवासस्थानी रात्री 08:00 वाजता बैठक होणार आहे.

 

 

आजच्या समन्वय समितीच्या बैठकीनंतर भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी या तीन पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून

 

या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने प्राचारयंत्रणा, सभा, दौरे या संदर्भात चर्चा झाली.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *