अजित दादांचे मंत्री म्हणाले आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना उलटी करतांना मी पाहिले नाही

Ajit Dada's Minister said I have not seen Health Minister Tanaji Sawant vomiting

 

 

 

 

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी बाबतीत केलेल्या विधानामुळे मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादीसोबत आपले कधीच पटले नाही.

 

कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आलं की उलट्या होतात. असे विधान तानाजी सावंत यांनी केलं. तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी बद्दल त्यांची नाराजी उघडपणे दिसून येतेय.

 

याच वक्तव्यावरुन आता अजित पवार गटाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. मंत्रिमंडळात तानाजी सावंत माझ्या बाजूला बसतात,

 

त्यांना उलटी करताना मी कधी बघितले नाही. तानाजी सावंत यांचे हे व्यक्तिगत मत असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि गोंदियाचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली आहे.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या 31 ऑगस्टला नागपुरात येत आहेत. दरम्यान त्यांची काटोलमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे.

 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काटोलवर दावा करण्याचा विषय नाही, काटोल राष्ट्रवादीची जागा आहेच, ती आम्ही मागणारच. किंबहुना अनिल देशमुख यांच्या विरोधात आम्ही तिथे उमेदवार देणार.

 

अहेरी येथेही अजित पवार येणार आहेत. ज्या जागा राष्ट्रवादीच्या आहेत त्यावर आमचे उमेदवार असणारच आहेत. अनिल देशमुख यांच्या विरोधात आम्ही सक्षम उमेदवार देणार आहोत.

 

मात्र तो उमेदवार नेमकं कोण हे महायुती ठरवेल. तर काही ठिकाणी अदलाबदली होऊ शकते असे मत मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी बोलताना व्यक्त केलं आहे.

 

 

राज्यात माझा प्रभाव वाढत आहे. विदर्भात जास्त जागा आम्ही मागत आहोत. त्यामुळे माझ्यावर काही आरोप होत असून निवडणुकीच्या तोंडावर हे आरोप होत आहेत.

 

मंत्रिमंडळात तानाजी सावंत माझ्या बाजूला बसतात, त्यांना उलटी करताना मी कधी बघितले नाही, तानाजी सावंत यांचे ते व्यक्तिगत मत असू शकतं.

 

तर मुख्यमंत्री हे मोठे नेते आहेत, यावर त्यांच्याकडून प्रतिक्रिया येणे आवश्यक आहे, तानाजी माझ्याप्रमाणे मंत्री आहेत असेही मंत्री धर्मराव बाबा आत्राम म्हणाले.

 

मी हाडामासाचा शिवसैनिक आहे. कधीही आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी माझं जमलेलं नाही. शिक्षण घेत असल्यापासून आत्तापर्यंत कधीही यांच्याशी जमलं नाही.

 

हे वास्तव आहे. आज जरी कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. ते सहन होत नाही, असंही तानाजी सावंत म्हणाले होते.

तानाजी सावंत राष्ट्रवादी बद्दल बोलण्याची ही काय पहिलीच वेळ नाहीये. सोशल मीडियावर तानाजी सावंत यांची आणखी एक क्लिप सध्या वायरल होतेय.

 

यामध्ये तानाजी सावंत हे धाराशिव लोकसभा बाबतीत बोलताना दिसतायत. “आपल्या मनाविरुद्ध तिकीट गेलं. ज्याला आपण मतदान करत नव्हतो त्यांना तिकीट दिलं.

 

त्यामुळे मी मतदान करा असे म्हणायला तुमच्यापार्यंत आलो नाही. कारण आपल्यालाच पटलेलं नव्हतं.“ असे विधान तानाजी सावंत यांनी केले आहे.

 

तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी बद्दल त्यांची नाराजी उघडपणे दिसून येतेय.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *