शरद पवारांना भेटताच दंडाच्या राष्ट्रवादीचा मोठा नेता म्हणाला अजितदादांसोबत काडीचा संबंध नाही
As soon as he met Sharad Pawar, the senior leader of Danda's NCP said that Kadi has no connection with Ajit Dada

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन बड्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. के. पी. पाटील
आणि ए.वाय. पाटील या दोन्ही नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. हे दोन्ही नेते राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातून
लढण्यासाठी इच्छूक असून शरद पवारांच्या भेटीनंतर के. पी. पाटलांनी अजितदादांसोबत काडीचा संबंध नसल्याचा दावा केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवार हे पुढील चार दिवस कोल्हापूरमध्ये मुक्काम करणार आहेत. यादरम्यान ते कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांची मोर्चेबांधणी करतील, असे बोलले जात आहे.
भाजपचे नेते समरजित घाटगे हे आज शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. तर अजितदादा गटाचे के. पी. पाटील हे शरद पवारांची भेट घेण्यासाठी पंचशील हॉटेलवर दाखल झाले.
त्यांच्यापाठोपाठ ए. वाय. पाटील यांनीही शरद पवारांची भेट घेतली. के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील हे राधानगरी भुदरगड विधानसभा मतदरासंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले हे दोन्ही नेते अजित पवार गटात होते. मात्र, या दोघांनी आता विधानसभेच्या उमेदवारीसाठी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देत महाविकास आघाडीकडून तिकीट मिळवण्याची तयारी सुरु केल्याचे चित्र आहे.
शरद पवारांच्या भेटीनंतर माजी आमदार के पी पाटील म्हणाले की, मी अजित पवारांसोबत कधीच गेलो नाही. अजित पवार गटामध्ये मी कधी गेलोय,
मी कधीही शरद पवार गटाचा राजीनामा दिलेला नव्हता. मी पहिल्यापासून राष्ट्रवादीमध्येच आहे. मी कधीही अजित पवार गटात पक्ष प्रवेश केला नाही.
त्यामुळे पुन्हा पक्षप्रवेश करण्याचा प्रश्नच कुठे येतो. मी महाविकास आघाडीच्या सोबतच कायम राहणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
तर ए वाय पाटील म्हणाले की, मी गेली दहा वर्ष राधानगरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. मात्र दोन वेळा मला शरद पवार साहेबांनी थांबायला सांगितले.
नेत्यांच्या शब्दाला मान देऊन मी निवडणूक लढवायचं थांबलो. पण आता शरद पवार यांच्या आशीर्वादामुळे मी ही विधानसभा निवडणूक लढवणार आहे.
शरद पवार मला उमेदवारी देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आता या दोन्ही नेत्यांमधून कुणाला उमेदवारी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जाणाऱ्या समरजित घाटगे यांना गळाला लावून भाजपला मोठा धक्का दिला आहे.
समरजीत घाटगे आगामी विधानसभा निवडणुकीत कागल मतदारसंघातून हसन मुश्रीफ यांच्याविरोधात दंड थोपटतील. आज शरद पवार
यांच्या उपस्थितीत समरजीत घाटगे तुतारी हाती धरतील. यानिमित्ताने तब्बल 10 वर्षांनी गैबी चौकात शरद पवार यांची सभा होणार आहे.