भाजप विधानसभेच्या किती जागा लढणार?;जेष्ठ मंत्र्यांनी सांगितला आकडा
How many seats will the BJP contest in the Legislative Assembly?; Senior Minister told the figure

भारतीय जनता पार्टीचे विधानसभेत अपक्ष धरून 112 आमदार आणि इतरांच्या 50 आणि 40 असे असताना स्वाभाविकपणे भाजप 150 ते 160 जागावर लढण्याची शक्यता आहे,
असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तसेच आमच्या पक्षात शिस्त हे महत्त्वाचे आहे. देवेंद्र फडणवीस हे इतर दोन पक्षाचे नेते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करत आहेत.
त्यामुळे नेमक्या किती जागा असतील हे फडणवीस सांगतील असे ही ते म्हणाले आहेत. तसेच कोथरूड विधानसभा मला लढवायची आहे.
यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील मुरलीधर मोहोळ आणि धनंजय महाडिक यांना देखील मार्गदर्शन करायचं असेही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. त्याच कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
राज्यभरात आज मोठ्या उत्साहात आणि व्यक्तिमय वातावरणात नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात देखील घटस्थापना झाली असून
लाखो भाविक दर्शनासाठी येत आहेत. आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकाळी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले.
यावेळी सर्वांना सुख समृद्धी मिळावी तसेच राज्यात महिला सबलीकरण व्हाव महिला सुरक्षित व्हाव्यात असे साकड त्यांनी अंबाबाई देवीकडे घातलं आहे.
यानंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत दादा यांनी अनेक विषयांवर आपले मत व्यक्त केले असून आज नवरात्रीची सुरुवात झाली आहे आणि पहिल्या दिवशी आई अंबाबाई आणि तुळजाभवानीची ओटी भरायची ठरवले होते.
इथे ओटी भरून आता तुळजापूरला निघालो आहे. सर्वांना सुख समृद्धी मिळावी महिला सबलीकरण व्हावे महिला सुरक्षित व्हाव्यात अशी नियमित प्रार्थना केली जाते.
मात्र नवरात्री ते आचरणात आणले पाहिजे. या नवरात्रीत मी 11 तारखेला 5000 मुलींचे कन्या पूजन करणार आहे.तसेच महिलांना चार तास कामाची वेळ असायला पाहिजे अशी माझी सरकारकडे मागणी होती
त्यात ही मी आता यशस्वी झालो आहे. 25 जणांची 4 तासाच्या नोकरीची पहिली बॅच या 9 दिवसात लॉन्च होत आहे आणि तेही टाटा कंपनीमध्ये लागणार आहे.
यापुढे एक हजार तरुणीला नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहे. यामुळे कॉलेजचे विद्यार्थिनी असेल तर कॉलेज करून चार तास काम करू शकतील
आणि घरकाम करणारे असतील तर घरचं काम करून चार तास काम करू शकतील. त्यामुळे महिलांना देखील आपण काहीतरी कमवलं असं वाटेल आणि घरालाही आधार देतील, असे चंद्रकांत दादा म्हणाले आहेत.