महायुतीत बेबनाव ?लाडकी बहीण योजनेच्या जाहिरात होर्डिगवरून अजितदादांचा फोटो गायब

Ajit Dad's photo missing from advertisement hoarding of Mahayuti Bebanav?

 

 

 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरीम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा केली होती.

 

ही योजना अल्पवधीतच लोकप्रीय ठरली, या योजनेला सध्या प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो.

 

सध्या राज्यात राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार आहे. मात्र आता लाडकी बहीण योजनेची जाहिरात करणाऱ्या होर्डिगवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो गायब असल्याचं समोर आलं आहे.

 

सातारा शहरातील पोवई नाक्यावर लावण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेची जाहिरात करणाऱ्या होर्डिगवरून अजित पवार यांचा फोटो गायब आहे.

 

या होर्डिंगवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दिसत आहे. मात्र या होर्डिंगवर फडणवीस समर्थकांनी अजित पवार यांचा फोटो लावला नसल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

 

लाडकी बहीण योजना ही सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. अंतरीम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली,

 

या योजनेंतर्गत पात्र असलेल्या 21 ते 65 वयोगटातील महिलेंच्या खात्यात दर महिन्याला सरकारकडून दीड हजार रुपये जमा केले जाणार आहेत.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *