बापरे…. दुबईत एक दिवसात पडला दोन वर्षांचा पाऊस एकच दिवसात;का घडले ?
Bapre... Two years of rain fell in one day in Dubai; why did it happen?

संयुक्त अरब अमीरात आणि त्याच्या आसपासच्या वाळंवटात मंगळवारी तुफान पाऊस झाल्याने भीषण पूर आल्याचा प्रकार समोर आला आहे.
जगातील सर्वात अधुनिक शहरांपैकी एक असलेल्या दुबईमध्ये रत्यावर पाणी वाहू लागल्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
यामुळे दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट देखील बंद करावा लागला. अनेक वाहने रस्त्यांवर अडकून पडले, शॉपिंग मॉल पासून ते मेट्रो स्टेशनपर्यंत सगळीकडे पाणी शिरलं.
गार्डियनच्या एका रिपोर्टनुसार पाऊस सोमवारी रात्रीपासून सुरू झाला आणि मंगळवार रात्रीपर्यंत दीड वर्षात होतो इतका पाऊस एकाच दिवशी झाला.
यूएईच्या आधी ओमान येथील अधिकाऱ्यांनी पूराची शक्यता वर्तवली होती, यावेळी देशात मागील ७५ वर्षात सर्वाधिक पाऊस झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दरम्यान वाळवंटात अचानक इतका पाऊस का झाला? हा प्रश्न सगळ्यांना पडतो आहे.
यूएईची सरकारी वृत्तसंस्था WAM ने मंगळवारी या पावसाला ऐतिहासिक घटना म्हटले आहे. १९४९ मध्ये डेटा गोळा करण्यास सुरूवात झाल्यापासून हा सर्वाधिक पाऊस देशात झाला आहे.
दरम्यान तज्ज्ञांच्या मते निसर्गासोबत छेडछाड केल्याचा परिणाम असल्याचे सांगत आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार दुबई आणि संयुक्त अरब अमीरातच्या दुसऱ्या भागात नुकतेच बाऊस आणि त्यानंतर पूर येण्याची घटना क्लाउड सीडिंगशी संबंधीत आहे.
संयुक्त अरब अमीरात पृथ्वीवरील सर्वात उष्ण आणि कोरड्या प्रदेशात येतेय या देशात पाऊस वाढवण्यासाठी क्लाउड सीडिंग तंत्रज्ञानाचा वारर करण्यात येतो.
या तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश वाढत्या लोकसंख्येसाठी आणि अर्थव्यवस्थेची पाण्याची गरज भागवण्यासाठी पाण्याची गरज पूर्ण व्हावी हा आहे.
यामुळे देशात पर्यटन आणि इतर क्षेत्रांमध्ये विविधता येत आहे. यूएईने २००२ मध्ये आपले क्लाउड सीडिंग ऑपरेशन सुरू केले होते.
ब्लूमबर्ग रीपोर्टनुसार हवामान तज्ज्ञ अहमद हबीब यांनी सांगितले की नुकतेच सीडिंगसाठी विमानांना अल-एन विमानतळावर पाठवण्यात आले होते.
कृत्रीम पाऊस पाडण्याच्या प्रक्रिया तंत्रज्ञानाला क्वाउड सीडिंग असे म्हटले जाते. या मध्ये विमान किंवा किंवा हेलीकॉप्टरचा वार करून ढगांमध्ये सिल्वर आयोडाइड किंवा पोटॅशियम आयोडाइड सारखे पदार्थ टाकले जातात.
यूएईच्या राष्ट्रीय हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार जास्तीत जास्त पाऊस पडावा यासाठी सीडिंग विमानांना दोन दिवसांत सात वेळा उड्डाणे केली होती.
दरम्यान या अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक नागरिक आणि पर्यटक यांनाही ठिकठिकाणी आश्रय घ्यावा लागला. बिग बॉस फेम गायक राहुल वैद्य हा देखील यावेळी दुबईत होता आणि अचानक आलेल्या या आपत्तीचा फटका त्यालाही बसला.
सोशल मीडियावर राहुलने त्याचा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडिओमध्ये तो पाणी भरलेल्या रस्त्यांवर हातात शूज घेऊन चालताना दिसतोय.
या व्हिडिओला त्याने ‘इथे खूपच वाईट परिस्थिती आहे…हबीबी दुबईमध्ये तुमचं स्वागत आहे’ असं कॅप्शन दिलंय. राहुलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.
राहुलने त्याच्या इंस्टाग्राम हॅण्डलवर दुबईतील रस्त्यांचे अनेक व्हिडीओज शेअर केले. या व्हिडिओमध्ये पुरामुळे दुबईच्या रस्त्यांवर साचलेलं पाणी, ट्राफिक, पाणी भरलेल्या रस्त्यातून वाट काढत जाणाऱ्या गाड्या दिसत आहेत.
फक्त दोन तास पाऊस पडल्यावर इकडची परिस्थिती पूर्णपणे बिघडल्याचे राहुलने या व्हिडिओमध्ये म्हंटल आहे. राहुल त्याच्या शोसाठी दुबईला गेला होता पण परत येताना
अचानक आलेल्या पावसामुळे तो रस्त्यातच अडकला. राहुलच्या दुबईमध्ये राहणाऱ्या मित्रांनी त्याला मदत करत कसबसं एअरपोर्टवर पोहोचवलं आणि त्याने फ्लाईट पकडून कोलकता गाठलं.
दुबईमध्ये आलेल्या या अचानक आपत्तीमुळे विमानतळावर सुद्धा पाणी साचलं असून अनेक फ्लाईट्स कॅन्सल झाल्या आहेत त्यामुळे अनेक विमाने उशिराने धावत असल्याचं म्हंटल जातंय.
तर दुबईआधील शाळा आणि ऑफिसेसना सुट्टी देण्यात आली असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान राहुल त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतो. काही वर्षांपूर्वी त्याने अभिनेत्री दिशा परमारशी लग्न केलं. काही महिन्यांपूर्वीच त्यांची लेक नव्याचा जन्म झाला.
सोशल मीडियावर राहुल नव्याचे बरेच फोटोज शेअर करत असतो. त्याची बायको दिशाचा बडे अच्छे लगते है हा शो खुप गाजला होता.
नकुल मेहतासोबतची तिची जोडी सगळ्यांनाच खूप पसंत पडली होती. तर आता दिशा पुन्हा टेलिव्हिजनवर कधी कमबॅक करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहील आहे.