BREAKING NEWS;हरियाणात राजकीय भूकंप; भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा

Political earthquake in Haryana; BJP Chief Minister resigned

 

 

 

 

 

देशभरात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. अशातच सर्वच पक्ष युती, चर्चा सभा, दौरे करत आहेत अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे.

 

 

 

लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणात भाजप-जेजेपी युती तुटली आहे. चंदीगडमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळासह राजभवनात पोहोचले

 

 

 

 

आणि त्यांनी संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा सुपूर्द केला. आता दुपारी एक वाजता शपथविधी होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

 

 

 

 

भाजपचे पर्यवेक्षक म्हणून अर्जुन मुंडा आणि तरूण चुघ हरियाणामध्ये दाखल झाले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासंदर्भातून युती तुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

 

 

 

हरियाणात विधानसभेच्या 90 जागा आहेत. सध्या 90 जागांपैकी भाजपकडे 41, काँग्रेसकडे 30, आयएनएलडीकडे 10, एचएलपीकडे एक आणि सात अपक्ष आहेत.

 

 

 

 

हरियाणात 46 आमदारांची गरज आहे. अशा स्थितीत हरियाणात गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ४१ जागा मिळाल्या होत्या,

 

 

 

तेव्हा त्यांनी जेजेपीच्या १० आमदारांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले होते. जेजेपीसोबत युती केल्यानंतर दुष्यंत चौटाला यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले.

 

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासंदर्भातून युती तुटली आहे. दोन्ही पक्षांकडून जागावाटपाबाबत समाधानकारक पर्याय न निघाल्याने दोन्ही पक्षांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.

 

 

 

भाजप-जेजेपी युती तुटली तरीदेखील त्याचा भाजपवरती मोठा परिणाम होणार नसल्याचे दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे भाजपचे 41 आमदार असून 7 अपक्षही त्यांच्या समर्थनात आहेत.

 

 

 

दरम्यान, हलोपाचे आमदार गोपाल कांडा यांनीही भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपला बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त जागा मिळत आहेत.

 

 

लोकसभेच्या जागावाटपाच्या मुद्द्यावरून भाजपने जेजेपी सोबत असलेली युती तुटल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे आता हरयाणामध्ये

 

 

भाजप स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. मनोहर लाल खट्टर आता लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे.

 

 

 

 

 

भाजपकडे 41 आमदार असून जेजेपीचे तीन आमदार आणि अपक्ष दोन आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे नवीन सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला कोणतीही अडचण येणार नाही.

 

 

हरयाणात विधानसभेच्या 90 जागा आहेत. येथे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 40 जागा जिंकल्या होत्या. पण भाजपला बहुमत मिळाले नाही आणि त्यांनी जेजेपीसोबत युती करून सरकार बनवलं. जेजेपीचे 10 आमदार आहेत.

 

 

 

 

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 31 जागा मिळाल्या होत्या. मात्र नंतर कुलदीप बिश्नोई यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. पोटनिवडणुकीत त्यांचा मुलगा भव्य बिश्नोई विजयी झाला होता.

 

 

 

अशा स्थितीत भाजपकडे 41 आमदार होते. आता भाजपला स्वबळावर सरकार बनवायचे आहे. त्यांना अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. बहुमताचा आकडा 46 आहे.

 

 

 

 

राजकीय गोंधळादरम्यान जेजेपीच्या दुष्यंत चौटाला यांनी त्यांच्या आमदारांची बैठक बोलावली होती. जेजेपीचे 10 आमदार आहेत,

 

 

 

पण त्यापैकी तीन आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. या तीनही आमदारांनी चौटाला यांच्या बैठकीला उपस्थिती लावली नव्हती.

 

 

 

दरम्यान, भाजप नायबसिंग सैनी यांना मुख्यमंत्री बनवणार असल्याची चर्चा आहे. ओबीसीतील सैनी समाजातून आलेले नायब सिंह हे हरियाणा भाजपचे अध्यक्ष आहेत.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *