Ladkya Bhaeen Yojana;लाडक्या बहीण योजना; ‘या’ महिलांना घेता येणार नाही योजनेचा लाभ
Ladkya Bhaeen Yojana; 'These' women will not be able to avail the benefits of the scheme

राज्यसरकारची ‘लाडकी बहीण’ ही योजना सुरुवातीपासूनच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेचा विषय ठरली आहे. या योजनेला राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
हे सुद्धा वाचा ..!आता गुरुजींसाठी टेन्शनची बातमी ; ज्येष्ठ शिक्षकांचीही होणार ‘परीक्षा
दरम्यान ही योजाना सुरू करताना या संदर्भात सरकारनं काही अटी घातलेल्या होत्या, मात्र या अटीमध्ये न बसणाऱ्या महिला देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताना दिसून येत आहेत, या संदर्भात आता शासनानं मोठा निर्णय घेतला आहे.
लाभार्थी महिलांच्या अर्जाची फेर पडताळणी करण्यात येत आहे, ज्या महिला या योजनेच्या अटींमध्ये बसत नाहीत त्यांचा अर्ज बाद ठरवला जात आहे, त्यांना या योजनेतून वगळण्यात येत आहे.
हे सुद्धा वाचा ..!The most expensive flat in the country;बापरे … ! मुंबईतील फ्लॅट विकला 639 कोटींना;पाहा काय आहे यात खासबात
अनेक महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त असताना तसेच नावावर घर आणि चारचाकी वाहन असताना देखील काही महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं दिसून आलं आहे,
या महिलांची नावं या योजनेतून वगळण्यात येत आहेत. धक्कादायक म्हणजे चक्क सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती आता समोर आली आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
हे सुद्धा वाचा ..!political news;भुजबळ मंत्री झाले पण अजित पवारांना विचारलेच नाही ,नेत्याच्या दाव्याने खळबळ
“लाभार्थ्यांची पडताळणी” ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतही ही प्रक्रिया राबवली जाते.
या प्रक्रियेत सेवार्थ मधील जवळपास २ लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे २२८९ सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी
हे सुद्धा वाचा ..!The most expensive flat in the country;बापरे … ! मुंबईतील फ्लॅट विकला 639 कोटींना;पाहा काय आहे यात खासबात
नाव नोंदणी केल्याची बाब जानेवारी- फेब्रुवारी दरम्यानच लक्षात आली असून तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांनाच देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, यासाठी अर्जांची पडताळणी ही नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे’. असा ट्विट आदिती तटकरे यांनी केलं आहे.
हे सुद्धा वाचा ..!भुजबळांच्या मंत्रिमंडळातील एंट्रीने ‘या’ ३ नेत्यांची पोटदुखी वाढली
दरम्यान यापूर्वी अडीच हजारांपेक्षा अधिक सरकारी कर्मचारी महिलांनी पैशांच्या मोहापायी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आणि या योजनेचे दीड हजार रुपये मिळवण्याचा हावरटपणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला .
या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून अनेकांनी फसवून योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते. त्यानंतर राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी देखील या योजनेचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले,
अनेक तक्रारीदेखील आल्या. राज्यातील तब्बल 1 लाख 60 हजांरापेक्षा अधिक (महिला-पुरूष) कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली असता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हे सुद्धा वाचा ..!शिवसेना कार्यालयात भूत ? स्वतः; मंत्र्यांनीच दिली माहिती
राज्यातील तब्बल 2 हजारांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेत त्याचे पैसे लाटल्याचे उघड झाले. याच पार्श्वभूमीवर आणखी 6 लाख कर्मचाऱ्यांची देखील तपासणी करण्यात येणार असून
फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.अडीच हजारांपेक्षा अधिक सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी योजनेचा गैरफायदा घेत पैसे लाटल्याचे उघड झाले असून या बातमीमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.