political news;भुजबळ मंत्री झाले पण अजित पवारांना विचारलेच नाही ,नेत्याच्या दाव्याने खळबळ

political news; became a minister but did not ask Ajit Pawar, the leader's claim creates a stir

 

 

yashwant college2
yashwant college2

 

 

 

 

छगन भुजबळ यांच्या अचानक मंत्रिपदाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दावा केला आहे की,

 

अजित पवारांना विचारात न घेता भुजबळ यांना मंत्रीपद देण्यात आले. राऊतांच्या या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हे सुद्धा वाचा ;…….कुर्बानीसाठी अतिशय स्वस्त दरात शेतकऱ्याकडून बकरे विक्रीला

नोव्हेंबमध्ये झालेल्या निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आणि पुन्हा सरकार स्थापन झालं. त्यानंतर शपथविधी होऊन मंत्रीमंडळत अनेक नेत्यांना स्थान मिळालं त्यात काही जुने नेते होते तर काही नवे चेहरेही दिसले.

 

मात्र महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील ज्येष्ठ, जाणते नेते छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळात संधि मिळाली नव्हती,

हे सुद्धा वाचा ;…….सुप्रिया सुळेंची राजकीय चाल बदलली ,मोदी सरकारला पाठिंबा तर इंडिया आघाडीला सुनावले

त्यावरून त्यांनी अनेकदा नाराजीही बोलून दाखवली होती. मात्र गेल्या आठवड्यात अचानक सूत्र फिरली आणि छगन भुजबळ यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.

धनजंय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले. अचानक झालेल्या या शपथविधीने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

 

पण आता याच शपथविधीबाबत मविआचे नेते, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नवा दावा केला आहे. अजित पवारांना न विचारता, छगन भुजबळ यांना मंत्री केलं,

हे सुद्धा वाचा ;…….मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात ,अजितदादा, एकनाथ शिंदे पेक्षा शरद पवार भारी ; तोंडभरून कौतुक

अजित पवारांना आता झोप येत नसेल , असं राऊत म्हणालेत. त्यांच्या या विधानाने खळबळ उडाली आलं असून जकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे .

 

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आरोपी असून तो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री धनंय मुंडे यांचा अगदी खास माणूस असल्याचंही समोर आलं.

 

संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो समोर आले आणि राज्यभरात संताप उसळला. जनमताचा उद्रेक झ्लायनंतर अखेर जानेवारी महिन्यात धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

हे सुद्धा वाचा ;…….political news;महायुतीत तणाव;अजितदादांच्या माजी मंत्र्याला बावनकुळेंनी सुनावले

त्यानंतर अखेर पाच महिन्यांनी भुजबळंना मंत्री मंडळात स्थान मिळालं आणि अन्न व नागरी पुरवठा खातं त्यांच्याकडे सोपवण्यात आलं. गेल्या आठवड्यात त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

 

मात्र भुजबळांच्या या अचानक झालेल्या शपथविधीमुळ अनेक चर्चा सुरू झाल्या. त्यावरच आता शिवेसना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी गौप्यस्फोट केला. ” अजित पवारांना नविचारता, छगन भुजबळ यांना मंत्री केलं.

हे सुद्धा वाचा ;……. narayan rane;राणेंनी केली उद्धव ठाकरे,राज ठाकरेंवर टीका,संजय राऊत म्हणाले; वय झालं, टोपाचे केसही पिकलेत, त्याचं भान ठेवा

त्यामुळे आता अजित पवारांना झोप येत नसेल. अजित पवार यांना न विचारता दिल्लीतून मंत्रीपदाचे आदेश येतात. उद्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला असेच आदेश येतील ” असंही राऊत म्हणाले.त्यांच्या या दाव्याने खळबळ उडाली असून खरंच हे असं घडलंय का, अशी चर्चाही सुरू झाली आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *