अशोक चव्हाण म्हणाले ; मला राजकारणातूनसंपवू नका, मी संपलो तर… !

Ashok Chavan said; Don't finish me from politics, if I finish... !

 

 

 

 

भोकर मतदार संघात सुरु असलेला विरोध माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना चांगलाच जिव्हारी लागल्याच दिसून येतं आहे. या विरोधाला सामोरे जात अशोक चव्हाण हे आता जनतेला भावनिक साद घालत आहेत.

 

”आम्ही विरोधकांना घेऊन एकत्र घेऊन बसतो. आमचं धुऱ्याचं भांडण नाही, पण तुमचं भांडण माझ्या वडिलांशी असेल तर, माझ्याशी असणे कारण नाही,

 

आणि माझ्याशी असेल तर माझ्या मुलीशी असणे कारण नाही. गावात येऊ नका, बोलू देऊ नका, असा प्रकार चुकीचा आहे. तुम्हाला माझा चेहरा पसंद नसेल तर काही हरकत नाही.

 

पण मला राजकारणातून संपवू नका. मी राहिलो नाही तर तुम्ही कोणाला सांगणार. तुम्ही साथ द्या”, अशी भावनिक साद राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे विद्यमान खासदार

 

अशोक चव्हाण यांनी भोकर मतदार संघातील जनतेला घातली. अर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथे आयोजित एका भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

चव्हाण पुढे म्हणाले की, ”माझं नाव घेतल्याशिवाय काही मंडळींना करमत नाही. २४ तास माझ्यावर टिका केली जात आहे. एक वेळेस टीव्ही बंद होईल, पण माझ्यावर टिका करणं सोडत नाहीये.

 

राजकीय क्षेत्रात मला जिवंत ठेवा, मी जिवंत राहिलो तर तुम्ही पण जिवंत राहणार. मी संपलो की सगळं संपलं. तुम्ही नंतर कोणाला बोलणार”, असं चव्हाण म्हणाले.

 

”विकासाच्या दृष्टीने पाऊल उचलायचं आहे. तुम्ही सांगा आम्ही तिथे हजर राहू, पण विरोध करू नका. भांडण २० तीस वर्ष चालावी असं नाही. पूर्वी मला जो पक्ष विरोध करत होता,

 

त्याच भाजप पक्षात आता आलो आहे. शेलगावच्या जनतेने मला साथ दिली आहे. विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सदैव तुमच्यासोबत राहणार”, असं देखील चव्हाण म्हणाले.

 

”मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणाच्या ताटातलं आरक्षण न काढता मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले आहे. सर्व काही स्पष्ट असताना अशोक चव्हाण कुठे कमी पडले.

 

शिंदे सरकार कुठे कमी पडलं? असा सवाल चव्हाण यांनी केला. ”साप साप म्हणून दोरीने बदडवायचा कार्यक्रम केला असेल तर तुम्ही ठरवा.

 

अशोक चव्हाण पाहिजे का नाही. माझा चेहरा आवडत नसेल तर मी काही करू शकत नाही. ज्यांना माझ्या कामाची किंमत आहे ते मला साथ दिल्याशिवाय राहणार नाही”. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

चव्हाण यांची तिसरी पिढी म्हणजे श्रीजया चव्हाण भोकर मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढणार हे जवळपास निश्चित आहे. तशी तयारी देखील चव्हाण कुटुंबियांनी सुरु केली आहे.

 

”विकास कामाचे भूमिपूजन असो किंवा लोकार्पण या माध्यमातून जनतेशी संवाद साधने सुरु आहेत. सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी श्रीजयाला राजकीय क्षेत्रात उठवले आहे.

 

तेव्हा श्रीजयाला साथ द्या” असं आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भोकर मतदार संघातील जनतेला केलं आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *