कारागृहात स्फोट; कैद्यांमध्ये घबराट

Prison explosion; Panic among the prisoners

 

 

 

 

महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. अमरावतीच्या कारागृहात स्फोट झाला आहे. काल रात्री 8. 30 वाजता ही घटना घडली आहे.

 

 

 

 

त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सहा आणि सात नंबरच्या बॅरेकजवळ स्फोटक सदृश्य वस्तू फेकण्यात आली होती. त्यानंतर हा स्फोट झाला.

 

 

 

छोट्या आणि देशी बॉम्बने हा स्फोट घडवण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेमुळे कैदी आणि कारागृहात घबराट पसरली आहे.

 

 

 

 

या अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहाततील स्फोट प्रकरणी दोन जणांना अमरावती पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

 

 

 

 

अमरावती कारागृहात स्फोट झाल्याची बातमी समोर आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र नंतर आता या घटनेबाबतची माहिती समोर आली आहे.

 

 

 

 

कारागृहात दोन फटाके फेकल्याचं उघड झालं आहे. अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात दोन फटाके फेकल्या प्रकरणी दोन जणांना ताब्यात पोलिसांनी घेतलं आहे.

 

 

 

मित्राच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेलिब्रेशन करताना फटाके फोडले. त्यातील दोन मोठे फटाके मध्यवर्ती कारागृह आले होते.

 

 

 

ताब्यात घेतलेल्या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. काल संध्याकाळी एका बॉलमध्ये बारुद भरलेले फटाके जेलमध्ये आढळले होते. या प्रकरणी आता दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

 

 

 

अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात काल बारुद भरलेले फटाके फेकल्या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

 

 

 

काल अमरावती कारागृहातून सुटलेल्या कैद्यांना पोलिसांनी परत चौकशीला बोलावलं होतं. काल तुरुंगातून सुटलेल्या कैद्यांनी जल्लोष म्हणून फटाके फेकल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

 

 

 

 

कारागृहात स्फोटक फटाका आल्याने जेलच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कारागृहात यापूर्वी गांजाने भरलेला बॉल आला होता. अशा घटना वारंवार घडत असल्याने कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

 

 

 

 

अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात क्रिकेट बॉलमध्ये बारुद भरलेली फटाका सदृश वस्तू आढळली. रात्रीच्या सुमारास जेल च्या भिंतीवरून वस्तू फेकल्यानंतर मोठा स्फोट झाला होता.

 

 

 

अमरावती पोलिसांनी रात्री जेलमध्ये सर्च ऑपरेशन केलं. जेलमध्ये बॉम्ब सापडल्याच्या चर्चेने खळबळ उडाली. पोलीस आयुक्त रेड्डी सह पोलिसांचा जेलमध्ये फौज फाटा जेलमध्ये आला. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकानेही जेल परिसरात पाहणी केली.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *