मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी कारवाई ;शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये खळबळ

Chief Minister Fadnavis' big action; excitement among Shinde group ministers

bj admission
bj admission

 

 

 

पारदर्शक आणि स्वच्छ कारभारासाठी आग्रही असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच मंत्रिमंडळातील 7 मंत्र्यांना धक्का दिला आहे.

 

तिसरं महायुद्ध जवळ? इराणने केली जगाची कोंडी, स्ट्रेट ऑफ होर्मूजचे महत्त्व काय?

राज्य मंत्रिमंडळातील सात मंत्र्यांच्या खासगी सचिव (पीए) आणि अधिकारी विशेष कार्य नियुक्त्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट हस्तक्षेप करत परवानगी नाकारली.

 

 

त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागात रुजू होण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयातून आधीच दिले गेले होते. मात्र हे अधिकारी तिथे हजर झाले नाहीत,

राज्यात हिंदी सक्तीचा मुद्दा तापला;सरकार अडचणीत,कवींकडून पुरस्कार वापसी

 

त्यामुळे आता सरकारने थेट नोटिसा बजावत कारवाईचा बडगा उगारला आहे.कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्याने या खासगी सचिवांची, विशेष अधिकाऱ्यांची पळापळ सुरू झाली आहे.

 

युद्धविरामची घोषणा होताच सोने – चांदीचे दर गडगडले

सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्र्यांकडे सेवा देत राहिलेल्या सचिवांना बजावलेल्या नोटिसांमध्ये ‘बेकायदेशीरपणे आपण त्या ठिकाणी कार्यरत आहात’ असा ठपका ठेवत, तात्काळ मूळ खात्यात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

 

या नोटिसांची झळ लागल्यानंतर शिवसेनेच्या नाराज मंत्र्यांमध्ये खळबळ उडाली असून, काही मंत्री थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याच्या फेऱ्या मारत आहेत.

 

राहुल गांधींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात घोटाळ्याचा आरोप

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे 5 मंत्री या कारवाईचे लक्ष्य ठरत असल्याने पक्षपाती वागणूक दिली जात असल्याची नाराजी व्यक्त करत आहेत. हा विषय आता पुढील मंत्रीमंडळ बैठकीत चर्चेला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

सत्तेत असलेले मंत्री आपल्या अत्यंत विश्वासातील व्यक्तींना पीए आणि ओएसडीसारख्या पदांवर नियुक्त करतात. त्यामुळे या नियुक्त्यांवरून सत्ताधारी पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

 

हिंदीवरून महायुतीचे सरकार अडचणीत ; संजय राऊत भडकले; शिंदेंना ओपन चॅलेंज

 

मात्र यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियंत्रण ठेवत मंजुरी नाकारल्याने भाजपच्या मंत्र्यांनाही आपल्या विश्वासू व्यक्तींच्या नेमणुकीसाठी हात आखडता घ्यावा लागत आहे.

 

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, भाजपच्या अनेक मंत्र्यांनाही स्वतःच्या खास माणसांना सचिव म्हणून नेमायचं आहे, मात्र देवेंद्रजींच्या पुढे त्यांचीही बोलती बंद झाल्याचं चित्र आहे.

इराण-इस्त्रायल युद्धाचा फटका खाद्यतेलाला; महागाईची फोडणी

 

त्यामुळे आता महायुतीमध्ये खासगी सचिवांच्या नियुक्तीवरून धुसफूस वाढणार की हे वादळ पेल्यातच शमणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *