दोन्ही ठाकरे एकत्र आलयास किती शक्ती वाढणार ?

How much power will increase if both Thackerays come together?

bj admission
bj admission

 

 

 

राज्याच्या राजकारणात सध्या मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांच्या युतीची चर्चा आहे. याबाबत दोन्ही पक्षांनी सकारात्मक संकेत दिले आहेत.

 

 

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत अशी इच्छाही दोन्ही पक्षातील नेत्यांनी व्यक्त केली आहे. हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास महाराष्ट्राला फायदा होईल असं विधान अनेकांनी केलं आहे.

हे सुद्धा वाचा!;विमानाच्या चाकातून आग आणि धूर 250, हज यात्रेकरू बालंबाल बचावले

 

आज आपण हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास दोन्ही पक्षांची ताकद किती वाढेल? या दोन्ही पक्षांना मिळालेल्या मतांची टक्केवारी काय आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

 

 

चित्रपट अभिनेते महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत राज यांनी मनसे-शिवसेनेच्या युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.

 

हे सुद्धा वाचा!;नदीत पूल कोसळून दुर्घटना; 15 पर्यटकांचा बुडून मृत्यू

याला उत्तर देताना राज यांनी, ‘एकत्र येऊन राहणे मला कठीण वाटत नाही. महाराष्ट्रातील मराठी लोकांच्या अस्तित्वासाठी आमचे वाद आणि भांडणे खूपच लहान आहेत’ असे विधान केले होते. तेव्हापासून या युतीची चर्चा सुरु झाली.

 

 

यानंतर उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिक्रिया देताना, मी छोटे छोटे वाद बाजूला ठेवण्यास तयार आहे, महाराष्ट्रातील लोकांना जे हवे आहे ते होईल असं म्हटलं होतं.

 

हे सुद्धा वाचा!;मनोज जरांगें यांच्याकडून महायुती सरकारला अल्टिमेटम

त्यामुळे या युतीच्या चर्चांना अधिक जोर आला. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या काही नेत्यांच्या कार्यक्रमांमध्ये भेटीगाठीही झाल्या. मात्र अजून युतीचा निर्णय अंतिम झालेला नाही.

 

 

गेल्या काही निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांची कामगिरी खराब झाल्याचे दिसत आहे. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने 95 जागांवर उमेदवार उभे केले होते

 

हे सुद्धा वाचा!;BREAKING NEWS;शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा नेता महायुतीच्या नेत्यांसोबत बैठकीला

यातील 20 जागा जिंकण्यात पक्षाला यश आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 10 टक्के मते मिळाली होती. तर राज ठाकरे मनसेने 125 जागांवर निवडणूक लढवली होती मात्र पक्षाचा एकही उमेदवार विजयी झाला नाही आणि पक्षाला 1.6 टक्के मते मिळाली होती.

 

 

राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्मान सेना या पक्षाने 2009 च्या विधानसभा निवडणुकीतून पदार्पण केले होते. पहिल्याच या निवडणुकीत पक्षाला 13 जागा मिळाल्या होत्या. तसेच पक्षाला 5.7 टक्के मते मिळाली होती. याच निवडणुकीत शिवसेनेने 16.3 टक्के मतांसह 44 जागा जिंकल्या होत्या.

 

हे सुद्धा वाचा!;Maharashtra Breaking News;मुख्यमंत्री फडणवीसांच्या जवळच ड्रोन पडल्याने एकच खळबळ ;नेमकं काय घडलं?

2009 नंतर राज ठाकरे यांच्या पक्षाची कामगिरी घसरली असल्याचे दिसत आहे. 2014 च्या महाराष्ट्र निवडणुकीत मनसेने 219 जागा लढल्या मात्र पक्षाला केवळ एक जागा मिळाली आणि मतांची टक्केवारीही 3.2 टक्क्यांपर्यंत घसरली.

 

 

त्यानंतर 2019 च्या निवडणुकीतही मनसेला 2.3 टक्के मिळाली होती, आणि पक्षाचा फक्त एक आमदार निवडून आला होता.

 

हे सुद्धा वाचा!;मातोश्री’वरून सर्वात मोठी अपडेट;शिवसेना ठाकरे गट, मनसे युती होणार? ‘

वरील सर्व आकडेवारी पाहिल्यानंतर हे दोन्ही पक्ष एकत्र आले तरी मतांच्या टक्केवारीत फारसा फरक पडणार नसल्याचे दिसत आहे.

 

हे सुद्धा वाचा!;“या” जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट, शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर

मात्र दोन्ही पक्ष एकत्र आल्यास जे उमेदवारांचा कमी फरकाने पराभव झाला होता, तिथे विजय मिळू शकतो. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांना फायदा होऊ शकतो.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *