राज्यात तापमानात वाढ “या” भागात गारपीटीची शक्यता
A rise in temperature in the state is likely to lead to hailstorm in "this" area

राज्यात तापमानाचा पारा सातत्याने वर चढत आहे. आज तापमानात कमाल वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अनेक ठिकाणी तापमान चाळीस अंशांच्या वर जात आहे.
मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. २५ मार्च रोजी मालेगाव येथे देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.
मालेगावमध्ये सोमवारी ४०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. मालेगावसह अकोला, यवतमाळ, सोलापूर आणि ब्रह्मपुरी येथे तापमानाने चाळीशी ओलांडली आहे.
तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. परंतु राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तिवली जात आहे.
विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. तेथे गडगडाटी वादळासह गारपीट होण्याचा दाट अंदाज वर्तविला जात आहे.
अवकाळी पुन्हा एकदा हजेरी लावणार असल्याचं चित्र आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात उष्णतेच्या लाटांपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात तापमान चाळीसीपार गेल्याने उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहे. पुढील 24 तासांत पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, सिक्कीम, पूर्व झारखंड, छत्तीसगड पूर्व विदर्भ,
आणि अरुणाचल प्रदेशांमध्ये देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळ, जोरदार वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे.
पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि वायव्य भारताच्या लगतच्या मैदानी भागात 26 मार्च ते 29 मार्चदरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे.
8 आणि 29 मार्च दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. छत्तीसगड, पूर्व झारखंड, पश्चिम बंगाल, पश्चिम आणि उत्तर ओडिशा येथे देखील गडगडासह अवकाळीची शक्यता आहे.
राज्यात तापमानात वाढ झाली आहे. विदर्भ मराठवाड्यात तापमान मोठ्या प्रमाणात तापमान वाढले आहे. वर्धा, सोलापूर, अकोला जिल्ह्यात सर्वाधिक तपमानाची नोंद झाली.
राज्यात सर्वाधिक तापमान मालेगाव शहरात होते. मालेगावात ४०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यवतमाळचे तापमान ४० अंशापेक्षा जास्त होते. ब्रम्हपूरी, वर्धा, नागपूर, जळगाव शहरातील तापमान ३९ अंशावर पोहचले होते.
विदर्भात सध्या मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. वर्धा, अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात पारा ४० शी पार गेला आहे. २८ मार्चनंतर राज्यात वातावरण ढगाळ राहणार आहे.
तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. राज्याचे हवामान कोरडे राहील. २८ नंतर ढगाळ हवामान वाढण्याची शक्यता आहे.
साउथ इंटेरियर कर्नाटक ते विदर्भावर असलेली द्रोणीका रेषा किंवा हवेची विसंगती अजून कायम आहे. त्यामुळे उत्तर-पूर्व वारे गुजरातवरून जाऊन राज्यात विशेषत: कोकण व मध्य महाराष्ट्रात आद्रतेसोबत गरम हवा घेऊन येत आहे.
अजून एक पश्चिमी विक्षोभ २९ मार्चपर्यंत उत्तर भारतावर प्रभाव करणार आहे. त्यामुळे राज्याच्या उत्तरी मध्य भागात २८, २९ आणि ३० मार्च दरम्यान आद्रततेत वाढ होण्याची शक्यता आहे.






