Rain warningALERT;1 ते 3 जून दरम्यान कुठे पडणार पाऊस ;हवामान विभागाचा काय आहे अंदाज ?

Rain warningALERT;Where will it rain between June 1 and 3; What is the weather department's forecast?

 

 

 

यंदा देशासह महाराष्ट्रात मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला आहे, सध्या अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाकडून आता पुन्हा एकदा पुढील तीन दिवस अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

पश्चिमेकडून जोरदार वारे वाहणार असून, त्याचा परिणाम म्हणजे केरळमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 31 मे, 1 जून आणि 2 जून रोजी केरळसह, पश्चिम बंगाल, सिक्कीम या राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर पुढील दोन दिवस गोवा,

हे सुद्धा वाचा !…..BREAKING NEWS;मान्सून च्या पहिल्या आठवड्यातच धरणातून पाणी सोडण्याचा मोठा निर्णय;सतर्कतेचा इशारा

कर्नाटक, तामिळनाडू, आणि महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होईल असा अंदाज आयएमडीनं वर्तवला आहे.

 

हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील दोन दिवस महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, महाराष्ट्रामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 

भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा !…..pune Crime News;वैष्णवी हगवणे प्रकरणात काही बडे पोलीस अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात

महाराष्ट्रासोबतच आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपूरा, पश्चिम बंगाल, सिक्किम आणि ओडिशामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 

 

राज्यात सर्व जिल्ह्यात पावसाची नोंद झालेली आहे. जोरदार पावसामुळे काही ठिकाणी नद्यांना पूर देखील आला होता. मात्र सध्यास्थितीत पूर परिस्थिती नियंत्रणात असून कुठेही पूर आल्याची घटना घडलेली नाहीये.

 

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र सर्व जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्रांच्या सातत्याने संपर्कात आहे.पूर परिस्थिती बाबत उपाय योजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफ यांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

हे सुद्धा वाचा !…..ज्योती मल्होत्रानंतर पुन्हा तिघां गुप्तहेराना महाराष्ट्रात अटक

 

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 30 व 31 मे रोजी मराठवाडयात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक 1 ते 3 जून दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

पुढील तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 4 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवनार नाही तर पुढील पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

 

हे सुद्धा वाचा !…..narayan rane;राणेंनी केली उद्धव ठाकरे,राज ठाकरेंवर टीका,संजय राऊत म्हणाले; वय झालं, टोपाचे केसही पिकलेत, त्याचं भान ठेवा

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 30 मे ते 05 जून 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी व दिनांक 06 ते 12 जून 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

 

 

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे.

 

संदेश : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात पाऊस हा सरासरीपेक्षा कमी असल्यामूळे, शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये. जमिनित वापसा असतांना पूर्व मशागतीची कामे राहिली असल्यास पूर्व मशागतीची कामे करून घ्यावीत.

हे सुद्धा वाचा !…..ज्योती मल्होत्रानंतर पुन्हा तिघां गुप्तहेराना महाराष्ट्रात अटक

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

 

 

सोयाबीन पेरणीसाठी अति लवकर येणारे वाण: परभणी सोना (एमएयुएस-47), लवकर येणारे वाण: एमएयूएस-71 (समृध्दी), एमएयुएस-158, एमएयुएस-612, जवाहर (जेएस-335), शक्ती (एमएयुएस-81), मध्यम उशिरा येणारे वाण: प्रसाद (एमएयुएस-1), प्रतिकार (एमएयूएस-61), एमएयुएस-162, प्रतिष्ठा (एमएयूएस 61-2) इत्यादी वाणांचा वापर करावा. सोयाबीन पिकाच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. उगवण क्षमता 70 % पेक्षा जास्त असेल तरच बियाणे पेरणीसाठी वापरावे. जमिनित वापसा असतांना पूर्व मशागतीची कामे राहिली असल्यास पूर्व मशागतीची कामे करून घ्यावीत.

हे सुद्धा वाचा !…..Maharashtra Breaking News;आचारसंहिता लागू, पाच 5 विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुका जाहीर

खरीप ज्वारी पेरणीसाठी संकरीत वाण: सीएसएच-14, सीएसएच-16, सीएसएच-25 (परभणी साईनाथ), सुधारीत वाण: परभणी शक्ती, पीव्हीके-809, पीव्हीके-801 (परभणी श्वेता) इत्यादी वाणांचा वापर करावा. जमिनित वापसा असतांना पूर्व मशागतीची कामे राहिली असल्यास पूर्व मशागतीची कामे करून घ्यावीत. बाजरीच्या पेरणीसाठी संकरीत वाण: सबुरी, श्रध्दा, शांती, एएचबी-1269, एएचबी-1200 (एफई) सुधारीत वाण: आयसीटीपी, समृध्दी, परभणी संपदा या वाणांचा वापर करावा. जमिनित वापसा असतांना पूर्व मशागतीची कामे राहिली असल्यास पूर्व मशागतीची कामे करून घ्यावीत.

 

ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, प्रादुर्भावग्रस्त पाने काढून नष्ट करावीत, पिवळ्या चिकट सापळ्यांचा पिकात वापर करावा, रासायनिक कीटकनाशकामध्ये व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 30 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 3 मिली किंवा ॲसीफेट 75% 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

हे सुद्धा वाचा !….. Will Dhananjay Munde retire from politics?;धनंजय मुंडे यांनी घेतला मन:शांतीचा निर्णय

ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. हळद लागवडीसाठी सेलम, कृष्णा, राजापूरी, फुले स्वरुप या सुधारीत जातींची निवड करावी.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *