आता सेट-टॉप बॉक्सची गरज नाही;BSNL कडून TV पाहण्यासाठी सेवा सुरु
Now no need for set-top box; BSNL launches TV viewing service
तुम्ही BSNL चे युजर्स असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण, आता तुम्हाला TV पाहण्यासाठी सेट-टॉप बॉक्सची गरज नाही. BiTV लाईव्ह टीव्ही सेवेच्या मदतीने तुम्हाला TV पाहता येणार आहे. मात्र, यासाठी तुमच्याकडे BSNL चे सिमकार्ड असणे आवश्यक आहे.
BiTV लाईव्ह टीव्ही सेवा सुधारण्यासाठी BSNL कडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. याच अनुषंगाने सरकारी टेलिकॉम ऑपरेटरने आपल्या युजर्सना लाईव्ह TT सुविधा देण्यासाठी BiTV सेवा सुरू केली आहे.
यासाठी BSNL कंपनीने OTT प्लेसोबत हातमिळवणी केली आहे. यापूर्वी तामिळनाडूतील पुद्दुचेरीमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून ही सेवा सुरू करण्यात आली होती. आता ती संपूर्ण देशात आणण्यात आली आहे.
BiTV सेवेच्या मदतीने BSNL आपल्या युजर्सना स्मार्टफोनवर थेट इंटरनेट TV पुरवू इच्छित आहे. युजर्सला या मदतीने 450 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्स मिळणार आहेत. यात अनेक प्रीमियम चॅनल्सचाही समावेश आहे.
BSNL च्या BiTV सेवेअंतर्गत Bhaktiflix, Kanccha Lannka, STAGE, Shortfundly, OM TV, Playflix, Fancode, Hubhopper, Distro, आणि Runn TV सह 450 हून अधिक TV चॅनल्स पाहता येतील.
BSNL BiTV युजर्सना लाईव्ह टीव्ही सेवेचा वापर करणे अगदी सोपे आहे. त्याचा वापर करायचा असेल तर (https://fms.bsnl.in/iptvreg) जावे लागेल.
त्यानंतर राज्याची निवड करावी लागेल. यानंतर तुम्हाला एक OTP पाठवला जाईल, ज्यात प्रवेश केल्यानंतर तुम्ही सर्व्हिस अॅक्टिव्हेट करू शकता.
Google Playstore वर जाऊन तुम्ही OTT Play अॅप डाऊनलोड करू शकता. OTT Play अॅपचा वापर करण्यासाठी तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबरच्या मदतीने लॉगिन करावे लागेल.
BSNL ने नुकतीच पुद्दुचेरीमध्ये आपली डायरेक्ट-टू-मोबाइल (D2M) सेवा सुरू केली आहे. हे सेवा BiTV म्हणून ओळखली जाते. ही सेवा मोबाईल युजर्सना 300 पेक्षा जास्त लाईव्ह टीव्ही चॅनेल विनामूल्य पाहण्याची संधी देते.
IFTV सेवा अखंड कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल मनोरंजनाचे आश्वासन देते. ही भारतातील पहिली फायबर-आधारित इंटरनेट टीव्ही सेवा आहे.
ही सेवा युजर्सना बफरिंग शिवाय क्रिस्टल स्पष्ट गुणवत्तेत 500 पेक्षा जास्त लाईव्ह टीव्ही चॅनेल आणि प्रीमियम पेटीव्ही कंटेंट देते. विशेष म्हणजे BSNL भारत फायबर युजर्स कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय IFTV सेवेचा लाभ घेऊ शकतील.