mahayuti crises;अमित शहांकडे भाजप आमदारांनी केली अजित पवारांची तक्रार

BJP MLAs complain to Amit Shah about Ajit Pawar

 

 

 

सध्या महायुतीमध्ये एकदुसऱ्यावर कुरघोडी करण्याचे प्रकार सुरु आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समोर भाजपच्या काही आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात नाराजी सूर व्यक्त केला.

 

अजित पवारांच्या कुरघोड्यांना रोखा, असे म्हणत भाजप आमदारांनी अमित शाह यांच्याकडे साकडे घातले. यावर अमित शाह यांनी भाजपच्या आमदारांना कानमंत्र दिला.

 

भाजप आमदार अमित शाह यांच्याकडे अजित पवारांबाबत तक्रार घेऊन गेले. यावर उलट अजित पवारच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत, असा कानमंत्र दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

हे सुद्धा वाचा ;…परभणी जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरु;बँकेतून २६ हजार लांबवले

अजित पवारांची तक्रार करु नका, उलट सर्व मंत्र्यांच्या मागे लागा अशी सूचना अमित शाह यांनी दिल्या. आपल्या आमदारांची संख्या अधिक,अशात मागे हटू नका,

 

प्रशासन आणि सरकार पातळीवर आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा करा, असं अमित शाह यांनी आमदारांना म्हणाले. आपल्याला महायुती म्हणूनच पुढे जायचं आहे, असंही अमित शाह यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा ;…Hingoli News;हिंगोली जिल्ह्यातील जयसेन इंगोले यांची मंत्रालयात अवर सचिवपदी पदोन्नती

 

नांदेडमध्ये सभेच्या दरम्यान हा प्रसंग घडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते, अशी माहिती समोर येत आहे.

 

2024 साली विधानसभेत भाजपा आमदारा समोर पराभूत उमेदवाराना ताकद देण्याचे काम मुद्दाम अजित पवार करत आहे.

 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत अजित पवार मुद्दाम भाजपा ताकद कमी करू पाहत असून भाजपा विरोधकांना ताकद देताय,

हे सुद्धा वाचा ;…maharashtra Corona alert ;कोरोना मुळे युवकाचा मृत्यू ;सरकारकडून सर्व रुग्णालयांना बेड, ऑक्सिजन, व्यवस्था करण्याच्या सूचना

याकडे लक्ष द्यावे…अशी तक्रारी पाढाच भाजपा आमदारांनी मंत्री यांनी अमित शाहा समोर मांडला. यावर आपल्या आमदारांची संख्या अधिक,अशात मागे हटू नका…प्रशासन आणि सरकार पातळीवर आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा करा, असं अमित शाह यांनी आमदारांना म्हणाले.

 

उलट अजित पवारच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत, असा कानमंत्र दिल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे व पुणे स्वबळावर लढण्याबाबत भाजपची चाचपणी सुरु असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी महापालिका निवडणुकीबाबत संकेत दिले आहेत. अमित शाह यांच्याकडून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेण्यात आला.

हे सुद्धा वाचा ;… कुर्बानीसाठी अतिशय स्वस्त दरात शेतकऱ्याकडून बकरे विक्रीला

अजित पवार हे भाजपाची ताकद कमी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा सूर या आमदारांच्या तक्रारीचा होता. 2024 मधील विधानसभेतील भाजप आमदारासमोरील पराभूत उमेदवारांनाच दादा पाठबळ देत असल्याची तक्रार त्यांनी केली.

 

भाजपा विरोधकांना अजितदादा ताकद पुरवत असल्याचा त्यांचा दावा होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपाची ताकद कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा दावा तक्रारकर्त्या आमदारांचा होता.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *