आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
MLA Sanjay Gaikwad, Marine Drive Police, MLA Niwas Canteen, MLA Niwas Canteen, I Don't Care, Chief Minister Devendra Fadnavis, Sanjay Gaikwad: Case registered against Sanjay Gaikwad, will he be beaten up in the MLA residence canteen?


शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात मारहाणीप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 352 अपमानित करणे, 115(2), मारहाण करणे , 3(5), संगनमत करून मारणे या कलमांतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
BREAKING NEWS;गृहमंत्री अमित शाह यांचे निवृत्तीबाबत मोठे विधान
या अदखलपात्र गुन्ह्यांची माहिती मरीन ड्राईव्ह पोलिसाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्राद्वारे कळवली जाणार आहे. समाज माध्यमांमधील व्हिडीओ आणि स्थानिकांकडे केलेल्या चौकशीच्या आधारे या दखलपात्र गुन्ह्यांची नोंद केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
आपल्याला शिळं अन्न दिलं म्हणून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवास कँन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती.
आयकर विभागाची थेट शिंदे गटाच्या मंत्र्याला नोटीस
त्या संबंधी व्हिडीओ आमदार निवास कँन्टीन झाला. या प्रकरणी जर गुन्हा दाखल झाला तर त्याला सामोरं जाणार असल्याची प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली होती.
मी कुठलाही मोठा गुन्हा केलेला नाही मी चांगल्या गोष्टीसाठी सौम्य मारहाण केली आणि चांगल्या गोष्टीसाठी कितीही माझ्यावर गुन्हे दाखल झाले तरी आय डोन्ट केअर असं म्हणत आमदार संजय गायकवाड यांनी सांगितलं होतं.
शिक्षण उपसंचालकावर निलंबनाची कारवाई, SIT चौकशी होणार
तर चौकशीसाठी कुणी तक्रार करावी असं नाही. पोलिस स्वत: चौकशी करू शकतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं. त्यानुसार आता गुन्हा दाखल करण्यात आल्याची चर्चा आहे.
आमदार गायकवाड यांनी आमदार निवास कॅन्टीनमध्ये जेवणं मागवलं. वरण आणि भाताचा पहिला घास खाल्यावरच त्यांना ते खराब असल्याचं लक्षात आलं.
मंत्री संजय शिरसाट यांच्यावर पैशांची बॅग घेऊन बसल्याचा आरोप
त्याच संतापात त्यांनी खाली कॅन्टिनमध्ये जात ‘मला विष खायला घालतो का’ असं विचारल कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली.
प्लास्टिकच्या पिशवीत पार्सल केलेल्या डाळीला वास येत असल्याचा दावा करत त्यांनी कर्मचाऱ्याला त्याचा वास घ्यायला लावला आणि तुफान मारहाण केली.
आमदारांची बदनामी थांबवण्यासाठी मागितली कोटीची खंडणी; दहा लाख घेताना रंगेहात अटक
आमदार निवासातील कँटिनचा मालक दाक्षिणात्य असून विरोधकांना त्याचा एवढा पुळका का आला आहे, असा सवालही संजय गायकवाड यांनी विरोधकांना केला होता.
मारहाणीवरुन माझ्यावर विरोधक टीका करतात. मला त्यांना सांगायचं आहे की, महाराष्ट्र हा साऊथच्या लोकांनी नासवला. सगळ्या लेडीजबार, डान्सबारने तरुणाई बरबाद केली, महाराष्ट्राची संस्कृती खराब केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर रिटायर्ड होणार; मोहन भागवतांच्या विधानाने चर्चांना उधाण
मी जे केलं ते महाराष्ट्रातील लोकांसाठी केलं. मग तुम्हाला साऊथ इंडियन लोकांचा पुळका येण्याची गरज काय, असा सवाल संजय गायकवाड यांनी विरोधकांना विचारला.