राज्यातील या सात आयएएस अधिकाऱ्यांचे खाते बदलले

The accounts of these seven IAS officers in the state have been changed.

bj admission
bj admission

 

 

राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरूच असून आताही सात अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश निघाले आहेत.

 

 

त्यामध्ये डॉ. अशोक करंजकर यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर संजय कोलते यांची मुंबईतील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या असंघटीत कामगार विकास आयुक्तपदी सुशील खोडवेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासह एकूण सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

 

अजित पवारांच्या आमदाराचा, ६२ कोटींच्या गैरव्यवहाराचा भाजप नेत्यांनेच केला पर्दाफाश

कोणत्या अधिकाऱ्याची बदली कुठे?
1. डॉ. अशोक करंजकर (IAS:SCS:2009) यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ, मुंबईचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

2. संजय कोलते (IAS:SCS:2010) जिल्हाधिकारी, भंडारा यांची शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

विधानसभा निवडणुकीसंदर्भात शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट

3. सुशील खोडवेकर (IAS:RR:2011) सदस्य सचिव, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ, मुंबई यांना विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

4. सावन कुमार (IAS:RR:2019) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार यांची जिल्हाधिकारी, भंडारा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

संजय राऊत यांच्या जगदीप धनखड यांच्याबाबतच्या दाव्याने एकच खळबळ

5. नमन गोयल (IAS:RR:2022) प्रकल्प अधिकारी, ITDP, भामरागड आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, अटापली उपविभाग, गडचिरोली यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

 

 

6. डॉ.जी.व्ही.एस. पवनदत्त (IAS:RR:2023) सहाय्यक जिल्हाधिकारी, देसाईगंज उपविभाग, गडचिरोली यांची सहायक जिल्हाधिकारी, इगतपुरी उपविभाग, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राहुल, प्रियांका गांधींसह अनेक खासदारांना अटक, राजकारण तापणार

 

7. लघिमा तिवारी (IAS:RR:2023) सहायक जिल्हाधिकारी, बल्लारपूर उपविभाग, चंद्रपूर यांची सहायक जिल्हाधिकारी, गोंडपिंपरी उपविभाग, चंद्रपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

या आधी गेल्या आठवड्यातच पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये तुकाराम मुंढेंचाही समावेश आहे.

 

महाराष्ट्रात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट

1. तुकाराम मुंढे (आयएएस: आरआर: 2005) विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई यांना सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

 

 

2. नितीन काशीनाथ पाटील (आयएएस: एससीएस: 2007) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई यांना विशेष आयुक्त, राज्य कर, महाराष्ट्र, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

 

भाजप आमदाराने केली शरद पवारांच्या उच्च स्तरीय चौकशीची मागणी

3. अभय महाजन (आयएएस: नॉन-एससीएस: 2007) विशेष आयुक्त, राज्य कर, महाराष्ट्र, मुंबई यांना व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

 

 

4. ओंकार पवार (आयएएस: आरआर: 2022) सहाय्यक जिल्हाधिकारी, इगतपुरी उपविभाग, नाशिक यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

 

माहिती अधिकारी कार्यकर्त्याला 15 लाखांची लाच घेताना अटक

5. आशा अफजल खान पठाण – सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूर यांना महासंचालक, वनमती, नागपूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे आणि त्यांना सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूरचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

 

 

Related Articles