मराठा आरक्षणासंदर्भात लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक आरोप

Laxman Haake's sensational allegation regarding Maratha reservation

 

 

मराठा आंदोलनाला पवार कुटुंबीय रसद पुरवतात आणि त्यांचे आमदारही पैसे आणि रसद पुरवतात असा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

नेपाळच्या जेलमधून 5000 कैदी पळाले, भारतात आलेल्या 60 जणांना अटक

उद्धव ठाकरेंचे आमदारही मराठ्यांना रसद पुरवतात. एकेका आमदाराने 10 ते 15 लाख रुपये दिल्याचा आरोप, लक्ष्मण हाकेंनी केला आहे.

 

तुम्ही कायदेशीर आव्हान का देत नाही? अशी विचारणा केली असता लक्ष्मण हाके यांनी उत्तर दिलं की, “कायद्याने आम्ही आव्हान देऊच. सामान्य नागरिकही आव्हान देईल.

 

आमची कायदेशीर टीम ते करेल. पण प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही न्यायालयात जाऊन दाद मागायची का? तुम्ही असे बेजबाबदारपणे वागणार का?”

भारताच्या इतिहासातील पहिली घटना ;हेल्मेट न घातल्याने कार मालकाला दंड
पुढे ते म्हणाले की, “तुम्ही मंत्रिपदाची, मुख्यमंत्रीपदाची, विधानसभेची शपथ घेताना मी या महाराष्ट्रामधील समाज, त्यांच्या हक्कांबद्दल ममत्वभाव, आकस बाळगणार नाही हा शपथेचा अर्थ असतो.

 

अजित पवारांचे आमदार मात्र जरांगे पाटलाला रसद, डिझेल, गाड्या, माणसं पुरवतात. शरद पवार जाऊन त्या बेकायदेशीर मागणीचं समर्थन करतात. रोहित पवारांची आयटी सेल रात्रंदिवस त्यांना मदत करते.

नेपाळच्या जेलमधून 5000 कैदी पळाले, भारतात आलेल्या 60 जणांना अटक

तीच सगळी लोक मुंबईत येतात. मुंबईत आल्यानंतर सुप्रिया सुळेंपासून, बंडू जाधवापासून अंबादास दानवेंपर्यंत तिथे जाऊन बसतात. या माणसांना बेकायदा मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातील अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या बाबतीत काय घडू शकतं?”.

 

“अजित पवार, शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे आमदार हे सर्वजण रसद पुरवतात. मी फिल्डवर असून गावोगावी जातो. मला सांगितलेलं आहे. त्यांनी प्रेस घेऊन सांगितलं आहे.

भारत-पाकिस्तान मॅच रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

बजरंग सोनावणेंची स्टेटमेंट समोर ठेवू शकतो. अजित पवारांचे आमदार विजय सोळंकी आणि विजयसिंह पंडित यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगेंसोबत असल्याचं सांगितलं आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.

 

पुढे ते म्हणाले, “ते मुंबईपर्यंत कसे येतात? मुंबईपर्यंत गाड्या कशा येतात? त्यांच्या गाड्यांचा ताफा कुठून येतो? त्याला डिझेल कुठून येतं? मनोज जरांगे काय कारखानदाराचा,

 

आमदार, खासदाराचा मुलगा आहे का? या सर्व गोष्टी हालतात कुठून? कार्यकर्ते तर यामागे आहेच पण एका एका आमदाराने 10 ते 15 लाख दिल्याची जनतेत चर्चा आहे”.

 

ट्रम्प कडून G-7 देशांना ‘भारतावर टॅरिफ लावण्याचे आवाहन
मराठा आरक्षणाचा GR काढण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि सरकारला नाही, तसंच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनाही तो नसल्याचा घणाघात, लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

 

हा जीआर घटनाविरोधी असून, हा जीआर ओबीसींचं आरक्षण संपवणारा आहे. मराठ्यांचं कुणबीकरण सुरू आहे त्याला हा जीआर म्हणजे बुस्टर डोस असल्याची टीका, लक्ष्मण हाके यांनी केली आहे.

बॉलिवूडअभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार

यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये उरलासुरला मराठा ओबीसीमध्ये सामील झालेला असेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. झी २४ तासच्या टू द पॉईंट या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

 

 

 

Related Articles