अजित पवार जमीन व्यवहार प्रकरणी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Ajit Pawar preparing to take a big decision in the land deal case

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचं नाव सध्या वादात अडकलं आहे. कारण पार्थ पवार यांच्या मालकीची अमेडिया कंपनीने पुण्यातील हायप्रोफाईल कोरोगाव

 

आयटी पार्क परिसरातील 40 एकर सरकारी जमीन कमी किंमतीत घेतल्याचा आरोप होतोय. या जागेची किंमत ही 1800 कोटी इतकी आहे. पण ही जमीन अवघ्या 300 कोटी रुपयांत खरेदी करण्यात आली.

पुढील 3 दिवस महाराष्ट्रावर मोठे संकट येणार

एवढंच नाही तर या व्यवहारात स्टॅम्प ड्युटी ही केवळ 500 रुपयांत भरण्यात आली. संबंधित प्रकरण उजेडात आल्यानंतर मुद्रांक शुल्क विभागाने या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल केला.

 

पण यामध्ये पार्थ पवार यांचं नाव वगळण्यात आलं आहे. यानंतर आता मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. अजित पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाचा 7, 8, 9 आणि 10 नोव्हेंबरला अलर्ट, मोठा इशारा,

अजित पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जात भेट घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देखील होते.

 

मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तीनही नेते वर्षा बंगल्यावरुन निघाले आहेत. अजित पवार आता थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेत ते मोठी घोषणा करणार असल्याची माहिती आहे.

पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. संबंधित जमीन सरेंडर करण्याची अजित पवारांची तयारी करीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडेंनी रचला , जरांगे पाटलांनी ऐकवली धनंजय मुंडेंची ऑडिओ क्लिप

अजित पवार आज पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे आता या प्रकरणात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं आहे.

 

अजित पवार यांनी आज दिवसभरात दोनवेळा मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर जावून भेट घेतली आहे. पहिल्यांदा अजित पवार आज दुपारी बारा वाजता वर्षा बंगल्यावर गेले होते.

पार्थ पवार जमीन घोटाळा,राहुल गांधी म्हणाले मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत

पण त्यांची भेट होऊ शकली नव्हती. त्यानंतर अजित पवार वरळी डोमला माघारी परत होते. त्यानंतर पुन्हा दुपारी ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले. त्यांच्यासोबत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल होते.

 

यावेळी चारही नेत्यांमध्ये जवळपास 40 मिनिटे चर्चा झाली. या भेटीत जमीन व्यवहारावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. खरंतर ही शासनाची जमीन आहे. ती अशाप्रकारे लाटता येत नाही.

पार्थ पवार प्रकरणात प्रदीर्घ काळानंतर अण्णा गाजले आणि कडाडले

यामध्ये अनियमतता दिसत आहे. त्यामुळे ही जमीन आता परत करावी लागणार आहे. हे प्रकरण अजित पवारांना अडचणीत आणताना दिसत आहे. त्यामुळे ही जमीन परत करण्याची घोषणा कदाचित अजित पवार करण्याची शक्यता आहे.

 

Related Articles