चर्चा सोन्याची, पण भाव खाल्ला चांदीने
The talk was about gold, but silver ate the price

सराफा बाजारात पुन्हा एकदा दरवाढीचे वारे वाहू लागले आहेत. या वर्षी सणासुदीत उच्चांकी झेप घेतलेल्या सोन्या आणि चांदीच्या किमती आता कुठे आटोक्यात येत असताना बाजारात दरवाढीचा धमाका झाला आहे.
मागील काही महिन्यात जगभरात सोन्याची बरीच चर्चा रंगली पण, यामध्येही चांदीने सर्वाधिक भाव खाल्ला आणि लोकांना आश्चर्याचा धक्का बसला.
UIDAI ने केले 20 दशलक्ष आधार नंबर बंद
सध्या सोन्यापेक्षा चांदीला मागणी मिळताना दिसत असून इलेक्ट्रॉनिक्स, सोलार पॅनलमध्ये चांदीचा वापर वाढला आहे. परिणामी,
चांदीच्या दरात दिवसागणिक वाढ होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. लग्नसराईच्या हंगामात सोने आणि चांदीच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत.
निवडणुकांवर सुप्रीम कोर्टाची स्थगिती नाही ,मात्र टांगती तलवार कायम
लग्नसराईच्या हंगामात सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ नोंदवली गेली आहे. दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या दिवशी किमती वाढल्यानंतर काही दिवसांपासून किमती घसरत होत्या,
पण शुक्रवारी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी परतली असून चांदीच्या महागाईने सगळी मर्यादाच ओलांडली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कॉमेक्सवर 24 कॅरेट सोन्याचा भाव 1.04% वाढून प्रति औंस 4,245 डॉलर झाला, तर चांदीचा भाव 5.14% वाढून प्रति औंस 56.36 डॉलरवर पोहोचला आहे.
काँग्रेसच्या पराभवासाठी भाजपने केला अमेरिकेच्या CIAआणि इस्राईलच्या मोसादचा वापर ?
आंतरराष्ट्रीय बाजारातील या ऐतिहासिक दरवाढीचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही झाला आणि मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरही चांदीचा भाव कधी नव्हे इतका उसळला.
सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम अंदाजे 1,500 रुपयांनी वाढ झाली, तर चांदीच्या किमती एका दिवसात प्रति किलोग्रॅम अंदाजे 8,096 रुपयांनी वाढल्या. म्हणजे, लग्नसराईच्या हंगामात दागिने खरेदीदारांना आता अधिक फटका बसेल.
आता टीचभर नेपाळ चा सुद्धा भारताच्या थेट तीन भागांवर दावा
एमसीएक्सवर 5 डिसेंबर एक्सपायरीच्या 24 कॅरेट सोन्याचा भाव शुक्रवारी रात्री 10:30 वाजता 1.34% वाढून प्रति 10 ग्रॅम 1,29,380 रुपये झाला तर दिवसभरात 1,713 रुपयांनी वाढला.
दुसरीकडे, सोन्याती ल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर चांदीच्या किमती 4.33% किंवा प्रति किलोग्रॅम 8,096 रुपयांनी वाढून 1,74,083 रुपयांवर पोहोचल्या, जी आतापर्यंतचा उच्चांकी किंमत आहे.
आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या या 40 नगरपरिषदाच्या निवडणुकीवर कोर्टाची टांगती तलवार कायम
त्याचवेळी, ibja च्या आकडेवारीनुसार 24 कॅरेट सोन्याचा भाव 534 रुपयांनी किंचित वाढून 1,26,591 रुपयांवर पोहोचला असून चांदीच्या भावात 1,692 रुपयांनी वाढ होऊन प्रति किलो 1,64,359 रुपये झाला.









