शरद पवारांच्या पक्षफुटीमागे अदानींचे नाव

Adani's name is linked to Sharad Pawar's party split.

 

 

बारामती येथे अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या हस्ते ‘शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या केंद्राचं उद्घाटन करण्यात आल.

२०२६ पासून बँकांच्या वेळा बदलणार?

या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंबातील दिग्गज नेते मंडळी आणि गौतम अदानी एकाच मंचावर दिसून आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि गौतम अदानी यांच्या संबंधांवर काँग्रेसकडून टीका होत होती.

आता या प्रक्रियेशिवाय रेल्वेचे तिकिटे कन्फर्म होणार नाहीत, कोणती प्रोसेस आहे जाणून घ्या…

असं असताना आता शरद पवार आणि गौतम अदानी एकाच मंचावर असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. असं असताना शिवसाने उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे.

 

संजय राऊत म्हणाले की, मुंबईवर मोदी आणि भाजपचा मित्र ज्या पद्धतीने ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला आमचा तात्विक आणि नैतिक विरोध आहे. मुंबई गौतम अदानी यांच्या ताब्यात दिली जात आहे.

 

याला आमचा कडाडून विरोध आहे. त्या विरोधात आमची लढाई आहे. आतापर्यंत मुंबई अनेक उद्योगपती झाले आणि आहेत. पण अदानींसारखा हव्यास इतर उद्योगपतींकडून कधीच पाहिल्याच दिसून आला नाही.

लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार ४५०० रुपये

टाटा, बिर्ला, अंबानी यांच्यासह अनेक उद्योगपती या मुंबईत आलेत. पण मुंबई गिळण्यासाठी अदानी यांना जे प्रोत्साहन दिलं जातंय, ते घातक असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे.

 

अखेर दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र; अजित पवारांकडून घोषणा
संजय राऊत यांनी खळबळजनक आरोप केला आहे की, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यामागे गौतम अदानी यांचे बंधू विनोद अदानी यांचा मोठा हात आहे. राजकीय फायद्यासाठी उद्योगपतींचा वापर करून पक्ष संपवण्याचे हे कारस्थान असल्याचा दावा त्यांनी केला.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप आपल्या उद्योगपती मित्राला (अदानी) संपूर्ण मुंबई आंदण म्हणून देत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.

अजित पवारांच्या नेता पैशांची बॅग घेऊन मोजतोय कॅश

धारावी पुनर्विकास प्रकल्पासह मुंबईतील महत्त्वाच्या जमिनी अदानींच्या ताब्यात दिल्या जात असून, ही लढाई मुंबई वाचवण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

बारामतीमध्ये शरद पवार आणि गौतम अदानी एकाच मंचावर आल्याने राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर बोलताना राऊत यांनी ‘तात्विक आणि नैतिक विरोधाची’ भूमिका मांडली.

रेल्वेने रातोरात बदलले नियम ,RAC तिकिटांबाबत मोठी अपडेट

काँग्रेस आणि शिवसेनेसह (ठाकरे गट) मित्रपक्ष अदानींवर टीका करत असताना, पवारांच्या या कृतीमुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

Related Articles