आता रेशनकार्ड धारकांना तांदळाऐवजी गव्हासोबत मिळणार हे धान्य
Now ration card holders will get this grain along with wheat instead of rice

राज्य शासनाच्या अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत रेशनकार्डधारकांना नियमितपणे गहू व तांदूळ वितरित केले जातात. मात्र मार्च महिन्यापासून या वितरण पद्धतीत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.
एअर इंडिया विमान अपघाताबद्दल धक्कादायक बातमी
तांदळाऐवजी लाभार्थ्यांना गव्हासोबत मका दिला जाणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील लाखो रेशनकार्डधारकांच्या शिध्यात बदल होणार आहे.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यात आठ खरेदी केंद्रांवर मका खरेदी सुरू आहे. आतापर्यंत सुमारे १५ हजार क्विंटल मका खरेदी करण्यात आली असून ही खरेदी २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
खरेदी केलेली संपूर्ण मका रेशन दुकानांमार्फत लाभार्थ्यांना वितरित केली जाणार असल्याने पुढील तीन महिने गव्हासोबत मका मिळण्याची शक्यता आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये यासाठी खरंच कट शिजवला गेला?
या निर्णयामुळे शिधा वितरणात तात्पुरता बदल झाला असला, तरी शासनाकडून यामागे साठा व्यवस्थापन आणि स्थानिक पातळीवरील उपलब्धतेचा विचार केल्याचे सांगितले जात आहे.
अंत्योदय योजनेतील कुटुंबांना दरमहा १० किलो मका आणि ११ किलो गहू दिला जाणार आहे. तर प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी २ किलो गहू आणि १ किलो मका मिळणार आहे.
‘ट्रेड डील’ बळीराजाशी विश्वासघात
जिल्ह्यात अंत्योदय योजनेचे ८७ हजार ६४ रेशनकार्डधारक असून एकूण ३ लाख ८६ हजार ३४ लाभार्थी आहेत. प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत ६ लाख ३७ हजार ११४ रेशनकार्डधारक असून त्यांचे एकूण २५ लाख ६३ हजार ९७१ लाभार्थी आहेत. या सर्वांना नव्या निर्णयानुसार मका वाटप होणार आहे.
अजितदादा यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली पोस्ट
‘
रेशन दुकानांमधून नियमितपणे गहू आणि तांदूळ दिले जातात. काही वेळा ज्वारी, साखर, तेल किंवा डाळींचेही वाटप करण्यात आले आहे. यापूर्वी ‘आनंदाचा शिधा’ तसेच साड्यांचेही वितरण झाले होते. मात्र गव्हासोबत मका देण्याचा निर्णय प्रथमच मोठ्या प्रमाणावर घेतला गेला आहे.









