महामंडळाच्या बस प्रवास सवलतीसाठी ‘NCMC’ कार्ड आवश्यक
NCMC card required for corporation bus travel concession

राज्यभरातील एसटी आगारांमध्ये सवलतीच्या प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे.
बोगस ओळखपत्र दाखवून सवलतीचा लाभ घेणाऱ्यांवर चाप बसवण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) लवकरच विशेष नोंदणी मोहिम राबवणार आहे.
अजितदादांच्या अपघातावर बोलताना रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
राज्यात एसटीमार्फत विद्यार्थी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरस्कारार्थी अशा सुमारे ३५ प्रकारच्या सवलती दिल्या जातात. सध्या अनेक प्रवासी केवळ आधार कार्ड दाखवून सवलतीचा लाभ घेत असल्याचे आढळून आले आहे.
त्यामुळे गैरप्रकार रोखण्यासाठी आणि व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी स्मार्ट ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य करण्यात येत आहे. हे कार्ड असेल तरच सवलतीचा लाभ घेता येणार असून, एसटी बसमधून प्रवासही करता येणार आहे.
शेख सिकंदर अली ,शैक्षणिक सेवा कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित
कोकणासह राज्यातील सर्व आगारांमध्ये विशेष नोंदणी मोहिम राबवण्यात येणार आहे. प्रमुख बसस्थानकांवर नोंदणी केंद्र उभारण्यात येतील.
ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.
शेख सिकंदर अली ,शैक्षणिक सेवा कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित
या उपक्रमामुळे सवलतींची अचूक नोंद ठेवणे, गैरवापर टाळणे आणि प्रवाशांना अधिक सुरक्षित व स्मार्ट प्रवासाची सुविधा देणे शक्य होणार असल्याचा दावा महामंडळाकडून करण्यात आला आहे.
नवीन एनसीएमसी कार्डसाठी १९९ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. कार्ड हरवल्यास किंवा पुन्हा काढायचे असल्यास १४९ रुपये मोजावे लागतील.
राष्ट्रवादीतील एका गटाकडून अजित दादांच्या अपघाताबाबत शंका
कार्डमध्ये ५० रुपयांच्या पटीत रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार असून, अधिकृत काउंटर, ईटीएम मशिन तसेच मोबाईल अॅपद्वारे रिचार्जची सोय केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल.
ज्येष्ठ नागरिक व महिलांना आधार क्रमांकाशी संलग्न कार्ड मिळेल.
दिव्यांग प्रवाशांना यूडीआयडी क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल.
पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालयामार्फत विशेष कार्ड वितरित केले जाईल.








