लाचखोर तहसीलदाराला पन्नास हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात अटक

Bribing Tehsildar caught red-handed while accepting a bribe of Rs. 100,000

 

 

सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार थेट मंत्रालयापर्यंत पोहोचला असून एसीबीच्या छाप्यात हा उघड झाल्याचं अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिकाला लाच घेताना रंगेहात पडकल्याची घटना ताजी असतानाचा,

मंत्री छगन भुजबळ यांना तातडीने रुग्णालयात दाखल

मुंबईतील मुलूंड येथे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासही एबीसीने अटक केली आहे. आता, बीड जिल्ह्यातील परळीतून लाचप्रकरणाची  मोठी घटना समोर आली असून चक्क तहसीलदारच जाळ्यात अडकला आहे.

 

परळीतील तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे लाच प्रकरणात अडकल्याची घटना समोर आली आहे. तक्रारदारास सालन्सी प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांनी पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

राष्ट्रवादीतील एका गटाकडून अजित दादांच्या अपघाताबाबत शंका

तडजोडीअंती वीस हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. एसीबीने रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला होता.

 

मात्र, तक्रारदाराच्या हालचालीवर संशय आल्याने तहसीलदार मुंडे यांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचे सांगितले. तरीही एसीबीने आवश्यक ते सर्व पुरावे संकलित करून व्यंकटेश मुंडे यांना ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

एअर इंडिया विमान अपघाताबद्दल धक्कादायक बातमी

दरम्यान, एसीबीच्या या कारवाईमुळे महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. तर गेल्या काही दिवसांत एसीबीच्या वाढत्या छाप्यांमुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

 

मात्र, अद्यापही सरकारी कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांचे काम करण्यासाठी पैशांची मागणी होत असल्याचं भीषण वास्तव आहे.

पुढील 24 तासात हवामानात होणार मोठा बदल

 

Related Articles