खरात प्रकरणात महाराष्ट्रातील बड्या IAS अधिकारी निलंबित
Senior IAS Officer from Maharashtra Suspended in Kharat Case

सध्या राज्यभरात चर्चेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी नवनवीन अपडेट समोर येत आहेत. अशोक खरात प्रकरणी अनेक राजकीय नेत्यांचे फोटो समोर आले होते.
प्रशासनाकडून 13 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा
आता या राजकीय नेत्यांनंतर प्रशासकीय अधिकारीही अडचणीत आले आहेत. शेकडो महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीचे आरोप असलेल्या खरातशी संबंध मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांना प्रकरण भोवलं आहे.
अभिजीत भांडे पाटील यांचे अशोक खरातशी जवळचे संबंध असल्याचे उघड झाले आहे. खरातच्या पत्नीच्या आणि मुलीच्या नावे असलेल्या जमिनींमध्ये भांडे पाटील यांनी गुंतवणूक केली आहे.
मंत्रीमंडळ बैठकीत 14 मोठे निर्णय
खरातशी संबंधित अनेक व्यवहारांमध्ये या अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. एवढच नाही तर अभिजीत भांडेचे खरातचे फोन कॉल देखील समोर आहे. अभिजीत भांडे आणि अशोक खरात यांच्यामध्ये 4 एप्रिल 2025 ते 15 मार्च 2026 या कालावधील तब्बल 143 कॉल झाले होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अभिजीत भांडे यांचे कनेक्शन खरातसोबध आढळन आले आहेत. प्राथमिक चौकशीत भांडे दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर बंगालमध्ये हिंसाचाराचा भडका
एसआयटीचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. मात्र आमच्याकडे जे कॉल डिटेल्स आले त्यानंतर संपूर्ण चौकशी होईपर्यंत निलंबीत केले आहे. तसेच एसआयटीचा रिपोर्ट आल्यानंतर कडत कारवाई करण्यात येईल.
अभिजीत भांडे पाटील हे एसआरएमध्ये डेप्यूटेशनवर होते. 30 एप्रिलला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अभिजीत भांडे पाटील यांच्या विरोधात पत्र आणि पुरावे दिले होते.
घरोघरी भांडी घासण्याचे काम करणारी महिला झाली आमदार
खरात प्रकरणात त्यांना त्यांच्या मूळ महसुल विभागात पाठवण्यात आले होते. परंतु दीड महिना उलटला तरी त्यांच्यावर निलंबनाचा कारवाई होत नव्हती. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची परवा भेट घेऊन आक्षेप घेतला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना या प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. खरातच्या एका ट्रस्टमध्ये त्या संचालिका होत्या.
पश्चिम बंगालच्या निकालावरून संजय राऊत म्हणाले,दिवा विझताना अधिक फडफडतो
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच दोषी आढळणाऱ्या सर्व राजकारणी आणि अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.









