अवकाळीचे संकट कायम, शेतकऱ्यांची चिंता वाढली;पहा आज कोठे पडणार पाऊस

Unseasonal crisis continues, farmers worry increased; see where the rain will fall today

 

 

 

 

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर काही भागात गाराही पडल्या. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

 

 

 

शेतीसह फळबांगांना मोठा फटका बसला आहे. अशातच आता पुन्हा एकदा हवामान विभागाने पुढील 24 तास राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

 

 

 

आज राज्यासह देशभरात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये आज मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे,

 

 

तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. त्याशिवाय काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. आज महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.

 

 

 

पुढील 24 तासांमध्ये विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तास विदर्भातील अकोला, अमरावती, गोंदिया आणि नागपुरात विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रातही दोन दिवस पावसाची शक्यता आहे

 

 

 

पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राज्यात २६ ते २८ नोव्हेंबर या तीन दिवसांत झालेल्या अवकाळीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राची ही आकडेवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली.

 

 

यानुसार नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका यवतमाळ जिल्ह्याला बसला आहे. त्या खालोखाल बुलडाणा आणि नाशिक जिल्ह्याचे नुकसान झाले आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाच्या अंदाजानुसार बाधित क्षेत्राचा आकडा वाढण्याची शक्यता आहे

 

 

कांदा, द्राक्षाचे नुकसान नाशिक जिल्ह्यातील कळवणनांदगाव, नाशिक, निफाड, जंक्केश्वर, सटाणा, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, सिकर, चांदवड आणि येवला तालुक्यातील ३३ हजार ३८८ हेक्टरवरील कांदा, द्राक्ष, सोयाबीन,

 

 

मका, गहू, ऊस आणि फळपिकांना गारपिटीचा फटका बसला आहे. धुळे जिल्ह्यातील सात्री, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यातील २३४ हेक्टर क्षेत्रावरील केळी, पपई,

 

 

 

कापूस, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, अक्कलकुवा, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्राणी तालुक्यातील २,७८३ हेक्टरवरील भात, कापूस, तूर, मिरची, मका, कांदा पीक भुईसपाट झाले आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *