बीड प्रकरण ;अखेर वाल्मिक कराडावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल

Beed case; Finally, a case has been registered against Valmik Karada under MCOCA

 

 

 

आवादा कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराड संदर्भात एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे.

 

वाल्मिक कराडवर आज अखेर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

दरम्यान, या एकंदरीत प्रकरणावरुन आरोपांच्या फैरी झाडत रान पेटवणाऱ्य भाजप आमदार सुरेश धसांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

 

वाल्मिक कराडला आज मोक्का लागला असला तरी संतोष देशमुख यांच्या हत्येत एकालाही सोडणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्याच प्रमाणे एसआयटीने त्यांचे काम करून दाखवले.

 

कुणी मागणी केली म्हणून मकोका लागत नाही. पोलीस यंत्रणा आणि एसआयटी आपले काम करत आहे. त्यांनी जी कडी जोडली आहे त्यानुसार कारवाई केली गेली आहे.

 

जिथे जिथे कडी जोडली जाईल तिथपर्यंत कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया देत आमदार सुरेश धस यांनी या कारवाईवर समाधान व्यक्त केलं आहे.

 

आरोपीचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे म्हणाले की, 15 दिवसांपासून वाल्मिक कराड पोलिसाच्या ताब्यात आहे. आणखी कोणता तपास बाकी आहे. बँक खात्याची चौकशी कऱण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

 

त्यासाठी आरोपीची गरज नाही. यापूर्वीचे त्यांच्याविरोधातले 14 गुन्हे नील झाले आहेत. मग त्या गुन्ह्यांचा तपास का करायचा आहे?, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांची एकत्र चौकशी करायची होती,

 

तर मग दोन्ही आरोपी १० दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात आहे मग तेव्हा का नाही केली?, हा सगळा तपास 15 दिवसांपुर्वी करणार होतात. मग 15 दिवसांत काय तपास केला?,

 

असा युक्तिवाद वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरेंनी केला. तसेच वाल्मिक कराड तपासात सहकार्य करत नाही असं तुमचं म्हणणं असेल तर 15 दिवसांत त्यांनी काय सहकार्य केलं नाही ते आम्हाला सांगा…आता पोलीस कोठडीची गरज नाही, असंही सिद्धेश्वर ठोंबरे म्हणाले.

 

दरम्यान, संतोष देशमुख प्रकरणात जातीय द्वेषातून राजकीय दबावापोटी कार्यवाही न करता निष्पक्षपणे चौकशी करावी अन्यथा आत्मदहन करू, असा इशारा देत परळीकरांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे.

 

निवेदनात म्हटले आहे की, स्व. संतोष भैय्या देशमुख यांची हत्या झाली त्यामध्ये पोलिस प्रशासनाने आरोपी अटक केलेली आहेत. महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेल्या तपासयंत्रणा योग्य तो तपास करत आहेत.

 

आवश्यक ते पुरावे असतील आवश्यक असलेले आरोपी असतील त्यांना अटकही केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीची मिडीया ट्रायल, परळी व बीड जिल्ह्याची बदनामी करून जातीयद्वेष पसरवत आहेत त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडत आहे.

 

वाल्मिक कराडला केज कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच वाल्मिक कराडवर मकोका देखील लावण्यात आला आहे.

 

त्यामुळे सीआयडी मकोकाअंतर्गत नव्याने कोठडी मागणार आहे. न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवले जाईल. त्यानंतर उद्या मकोका अंतर्गत ताब्यात घेऊन केज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती समोर येत आहे.

 

राज्य सरकारने मुंबईतल्या संघटीत गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी ‘टाडा’ या कायद्याच्या धर्तीवर 1999 मध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (Maharashtra Control of Organised Crime Act) म्हणजेच ‘मकोका’ कायदा बनवलाय. मकोका कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालतो.

 

गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलीसांकडून प्रथम समज दिली जाते. पण या संधीचा आरोपीने गैरफायदा घेतला तर तो पोलिसांच्या रेकॅार्डवर येतो. आरोपीवर अटकेची तसच नंतर तडीपारीचीही कारवाई होते.

 

अशा आरोपींना अटक केली जाते. तरीसुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर तडीपारीची कारवाई केली जाते. यानंतरही आरोपीमध्ये जर सुधारणा होत नसेल तर, अशावेळी पोलीसांना मकोका अंतर्गत कारावाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

हफ्ता वसुली, खंडणीसाठी अपहार, सुपारी देणे, खून, खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी यांच्यासारखे संघटीत गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का लावला जातो.

 

मकोका लावण्यासाठी गु्न्हेगारांची दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते. टोळीतील एकट्या गुन्हेगाराने किंवा टोळीतील अनेकांनी गुन्हा केलेला असावा लागतो.

 

तसंच अटक केलेल्या आरोपींपैकी एकावर गेल्या 10 वर्षात दोन गुन्ह्यात आरोपपत्र सादर झालेलं असणं बंधनकारक आहे. पोलीसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत वाढवून मिळते.

 

या काद्यान्वये गुन्हेगाराला लवकर जामीन नसल्यामुळे अनेक गुंड वर्षानुवर्षे तुरुंगात राहतात आणि त्यामुळे त्यांची सुटका होईपर्यंत त्यांची संघटित टोळी मोडकळीस आलेली असते.

 

मर्डर, खंडणी, 307, दरोडा, खंडणीचा प्रयत्न, घुसखोरी आणि तत्सम गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा मागील दहा वर्षाचा इतिहास असणे कारवाईसाठी आवश्यक आहे. ज्यात दोन किंवा दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असणे

 

आणि पूर्वी तीन किंवा त्याहून जास्त शिक्षा झालेली असणे. अशा गुन्हेगारांवर मकोकाअंतर्गत कारवाई होऊ शकते. त्याचबरोबर जे गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्या ज्यांचा हिंसाचार,

 

आर्थिक फायद्यासाठी जे गुन्हा करतात अशा गुन्हेगारांवरती महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते.

मकोका लागल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन सहज मिळवता येत नाही. भारतीय दंड विदान संहीतेच्या लावलेल्या कलमांखाली जेवढी शिक्षा असेल तीच सिक्षा मोक्काच्या कलम 3 (1) नुसार देता येईल.

 

ही सिक्षा किमान 5 वर्षे ते जन्मठेपेपर्यंत राहते. त्याचबरोबर किमान दंड हा पाच लाखांपर्यांतचा असतो. तसंच दोषींची मालमत्ता जप्त करण्याचीही तरतूद या कायद्यात आहे.

 

संघटीत गुन्हेगारी करुन जर आर्थिक फायदा घेतला जात असेल किंवा टोळी तयार करुन जर गुन्हेगरी करत असाल तर त्या संदर्भात मकोकाची तरतूद केली आहे.

 

वाल्मिक कराड याच्यावर मकोका गुन्हा दाखल झाला आहे. वाल्मिक कराड याच्यावर मकोका लागल्याची बातमी आज दुपारी समोर आली. त्यानंतर लगेच पुढच्या दहा मिनिटात परळी शहर बंद करण्यात आलं. वाल्मिक कराडच्या समर्थकांनी परळी बंदची हाक दिली. या बंदला दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.

 

परळी शहरात आज मकरसंक्रांत असताना सुद्धा सर्व दुकानं बंद करण्यात आली आहे. बाजारपेठात आता शुकशुकाट बघायला मिळतोय. वाल्मिक कराडच्या समर्थकांनी परळी पोलीस ठाणे बाहेर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनात वाल्मिक कराडची वयोवृद्ध आईदेखील सहभागी झाली आहे.

 

या आंदोलनात कराड समर्थक आमदार संदीप क्षीरसागर, आमदार सुरेश धस यांच्या फोटोवर चपलीने मारताना दिसले. आंदोलक प्रचंड संतापले आहेत. दुसरीकडे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराड याच्यावर मकोका गुन्हा लागल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

 

“आमची शेवटपर्यंत एक मागणी आहे. आमच्या मागणीत कधीही बदल होणार नाहीत. या कट कारस्थानात जे माणसं आहेत त्या प्रत्येकाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे”, अशी भूमिका धनंजय देशमुख यांनी मांडली. दरम्यान, कोर्टात आज वाल्मिक कराडच्या कोठडीवर सुनावणी पार पडली.

 

यावेळी एसआयटीने वाल्मिक कराडचा ताबा मागितला. याबाबतचा निकाल अजून जाहीर व्हायचा आहे. धनंजय देशमुख यांना याबाबत प्रश्न विचारला असता, “त्यांच्याकडे पुरावे असतील. त्यामुळे त्यांनी दावा केलाय. मला CID वर विश्वास आहे. सीआयडीने पहिल्या सुनावणी दरम्यान जो युक्तिवाद केला होता

 

त्यामध्ये खंडणी ते खून प्रकरणात कनेक्शन आहे, असं होतं. मग त्या संदर्भातले पुरावे त्यांच्याकडे असतील म्हणून त्यांनी ताबा देण्यासाठी विनंती केली असेल”, असं धनंजय देशमुख म्हणाले.

 

“यानंतर या घटना घडल्या नाही पाहिजेत. मुळासकट हे उखाडून काढायचं आहे. न्यायाच्या भूमिकेत आम्ही मागणीवर ठाम आहोत. ज्यावेळेस आम्ही एसआयटीचे प्रमुख तेली साहेबांना भेटू त्यावेळेस अधिकच स्पष्टीकरण होईल. त्यांच्याकडून आम्हाला जी माहिती मिळणार आहे. ती मिळाली नाही माहिती घेण्यासाठी आम्ही जाणार आहोत.

 

वाल्मिक कराडची संपत्ती ते तपासतील. तो त्यांचा तपासाचा भाग आहे. परवाच्या दिवशी आम्ही माहिती द्या म्हणून मागणी केली होती. काल आम्ही आंदोलन केलं. मात्र त्याच्या अगोदर आम्ही पोलीस प्रशासनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर, सगळ्यांवर विश्वास ठेवला”, असं धनंजय देशमुख म्हणाले.

 

 

वाल्मिक कराड याच्या समर्थकांकडून सुरु असलेल्या आंदोलनाबाबत धनंजय देशमुख यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “आपण कसं बोलावं? माझ्या भाऊची हत्या केली. त्याला हिरावून घेतलं. आपण तेवढेच बोलणार”, अशी भावना धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली.

 

परळीत जमाबंदी असताना आंदोलन केलं जात आहे. याबाबत धनंजय देशमुख यांना प्रश्न विचारण्यात आला. “तेच म्हणतो ना त्यांचा भाग आहे. पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली, धिक्कार असो काहीतरी घोषणा दिल्या.

 

ते त्यांच्या बुद्धिमत्तेचा विषय आहे. त्याच्याविषयी मला बोलण्याची काहीच गरज नाही. मला माझ्या भावाला न्याय द्यायचा आहे. मी डायव्हर्ट होणार नाही, आणि मी माझ्या न्यायाच्या भूमिकेत कायम असेल”, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *