आमदाराच्या गाडीला बसचा भीषण अपघात
MLA's car meets with bus in horrific accident
राज्याच्या राजकारणातली सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना युबीटीच्या आमदाराच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.
एका बेस्ट बसने आमदाराच्या गाडीला उडवलं आहे. आमदार सुनील शिंदे असे या आमदाराचे नाव आहे. या अपघातात गाडीचे मोठं नुकसान झालं असल्याची माहिती आहे. तर आमदार सुनील शिंदे सुखरूप असल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर मुंबईत बेस्ट बसचा प्रताप सूरू असल्याचीच चर्चा आहे. कारण मुंबईच्या दादर परिसरात प्रवास करत असताना एका बेस्ट बसने शिंदे यांच्या कारला धडक दिली आहे.
खरं तर कारला बेस्ट बसची धडक बसण्याच्या काही मिनिटाअगोदर सुनील शिंदे हे कारमधून खाली उतरले होते. सुनील शिंदे हे कारमधून उतरून महेश सावंत
यांच्या शाखेच्या दिशेने निघाले होते. या दरम्यानच काही मिनिटांच्या अंतराने हा अपघात घडला आहे. त्यामुळे सुनील शिंदे हे सुदैवाने बचावले आहे.
दरम्यान ज्यावेळेस आमदार सुनील शिंदे यांच्या कारवा बेस्ट बसने धडक दिली. त्यावेळेस शिंदे यांचा ड्रायव्हर गाडीत बसला होता.
मात्र सुदैवाने ड्रायव्हर देखील या अपघातातून वाचला आहे. त्याला देखील कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. या घटनेने मात्र बेस्टचा प्रताप पुन्हा एकदा समोर आला आहे.
याआधी गेल्यावर्षी कुर्ल्यामध्ये 9 डिसेंबरच्या रात्री भीषण अपघात झाला होता. खासगी बेस्ट बसचे नियंत्रण सुटून तिने रस्त्यावरील अनेक लोकांना चिरडलं होतं
आणि अनेक वाहनांचा चक्काचूर केला होता.या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला होता तर 49 जण जखमी झाले होते. तर 20-25 वाहनांचा चक्काचूर झाला होता.