राज ठाकरेंचा प्रस्ताव अमित शहांनी फेटाळला;पाहा भेटीत काय घडलं?

Raj Thackeray's proposal was rejected by Amit Shah; see what happened in the meeting?

 

 

 

 

गेल्या साडे चार वर्षांत राज्यातील जनतेनं अभूतपूर्व घडामोडी पाहिल्या. भाजप-शिवसेनेची सुटलेली साथ, शिवसेनेनं धरलेला काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात, एकनाथ शिंदेंचं बंड, ठाकरेंची गेलेली सत्ता,

 

 

 

शिवसेनेत प्रचंड मोठी फूट, मग अजित पवारांनी केलेलं बंड, त्यामुळे फुटलेली राष्ट्रवादी अशा अनेक घडामोडींचा साक्षीदार मतदारराजा ठरला.

 

 

 

 

आता त्यात आणखी एका घटनेची भर पडत आहे. मागील निवडणुकीत ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत मोदी-शहांवर तुटून पडणारे, पुलवामात आरडीएक्स आलं कुठून असा सवाल विचारणारे मनसे प्रमुख राज ठाकरे

 

 

 

भाजपसोबत जाण्याच्या तयारीत आहे. त्यांनी कालच दिल्लीत जाऊन भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली.

 

 

 

 

अमित शहांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे महायुतीत चौथा पक्ष सहभागी होणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

 

 

 

शहांसोबतच्या बैठकीत राज ठाकरेंनी युती आणि जागावाटपाबद्दल चर्चा केली. राज यांनी लोकसभेच्या दोन जागा मागितल्या.

 

 

 

 

दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई अशा दोन जागांसाठी राज यांनी शहांना प्रस्ताव दिला. राज यांचा प्रस्ताव शहांनी फेटाळल्याचं वृत्त एबीपी माझानं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.

 

 

 

 

एक जागा निश्चितपणे देऊ शकतो. पण दुसरी जागा देणं कठीण असल्याचं शहा म्हणाले. लोकसभेनंतर पुढे काय, असा प्रश्न राज यांनी शहांना विचारला. सध्याच्या घडीला काहीच सांगू शकत नाही,

 

 

 

 

असं उत्तर शहांनी राज यांना दिलं. विधानसभा निवडणूक एकत्र लढवू. पण तेव्हाच जागावाटप तेव्हाच ठरवू, असंही शहा पुढे म्हणाले. अमित शहांनी विधानसभा निवडणुकीबद्दल राज यांना कोणताही शब्द न देता सावध भूमिका घेतली.

 

 

 

 

गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि मनसेच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू होत्या. मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडेंनी गेल्याच महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.

 

 

 

 

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवतीर्थावर जाऊन राज यांची भेट घेतली. पण गेल्या आठवड्यात राज आणि फडणवीस यांची मुंबईत झालेली एक गुप्त भेट गेमचेंजर ठरली.

 

 

 

 

या बैठकीत फडणवीसांनी पक्षश्रेष्ठींची भूमिका मांडली. त्यानंतर राज यांनी त्यांची मतं मांडली. युती आणि लोकसभा निवडणुकांसंदर्भात दोघांमध्ये चर्चा जाली.

 

 

 

त्यावेळीही राज यांनी तीन जागांची मागणी केली. तो प्रस्ताव फडणवीसांनी फेटाळला होता. शहांसोबतच्या बैठकीतही तेच घडलं.

 

 

 

राज ठाकरे आणि अमित शहांची भेट दिल्लीत झाली. त्याआधी राज यांचं वास्तव असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन भाजपचे महासचिव विनोद तावडेंनी त्यांची भेट घेतली.

 

 

 

 

दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर तावडेंसोबत राज ठाकरे शहांच्या भेटीसाठी रवाना झाले. त्यामुळे तावडे मिशन मनसेवर असल्याचं स्पष्ट झालं.

 

 

 

२०१४ मध्ये राज्यात भाजपचं सरकार आलं. त्यात तावडेंकडे शिक्षणमंत्री होते. ज्ञानेश्वर विद्यापीठातून त्यांनी घेतलेल्या पदवीमुळे वादंग निर्माण झाला.

 

 

 

2०१४ मध्ये बोरिवली विधानसभा मतदारसंघातून जवळपास ८० हजारांच्या मताधिक्क्यानं निवडून आलेल्या तावडेंचं तिकीट २०१९ मध्ये कापण्यात आलं. पण त्यानंतरही तावडेंनी कोणतीही खळखळ केली नाही.

 

 

 

राज्याच्या राजकारणातून साईडलाईन झालेल्या तावडेंना पुढे केंद्रीय राजकारणात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्या. भाजपनं त्यांची महासचिवपदी नियुक्ती केली.

 

 

 

 

भाजपनं यंदाच्या लोकसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात १९५ उमेदवारांची समावेश होता. ही यादी तावडेंनीच जाहीर केली.

 

 

 

यंदाच्या जागावाटपात, तिकीटवाटपात तावडेंची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. जळगाव, रावेरचे उमेदवार निश्चित करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.

 

 

जळगावातून उन्मेष पाटलांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली. तर रावेरमधून रक्षा खडसेंना कायम ठेवण्यात आलं.

 

 

या दोन्ही नेत्यांना स्थानिक नेत्यांचा विरोध होता. पण आता या दोन्ही जागांवर भाजपकडे आघाडी आहे. इथे उमेदवार शोधताना विरोधकांना धाप लागत आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *