भाजपकडून आमदारांना ५० कोटींची ऑफर; मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ

BJP offers 50 crores to MLAs; Excitement due to Chief Minister's claim

 

 

 

 

सध्या देशभरात लोकसभा निवडणूकांची जोरदार तयारी सुरू आहे. कर्नाटकामध्ये २८ जागांसाठी २ टप्प्यांत मतदान होणार आहे. त्यापुर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

 

 

 

 

भाजप लोकसभा निवडणूकीपूर्वी दक्षिण राज्यांमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ चालवण्याच्या प्रयत्नात असल्याचे व्यक्तव्य सिद्धारामय्या यांनी केलं आहे.

 

 

 

भाजप नेत्यांने सांगितले की, जर काँग्रेस पक्ष कर्नाटकामध्ये लोकसभा निवडणूक पराभूत झाला तर सिद्धारामय्या सरकार पडेल. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सिद्धारामय्या यांनी म्हटलं की,

 

 

 

 

“भाजप मागील एक वर्षापासून आमचं सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या आमदारांना ५० कोटी रुपयांची ऑफर दिली होती. त्यांनी पूर्ण प्रयत्न केले परंतु ते अयशस्वी झाले.”

 

 

 

पुढे बोलताना सिद्धारामय्या म्हणाले, “आमचे सरकार पाडणे शक्य नाही. आमचे आमदार साथ सोडणार नाहीत. एक सुद्धा आमदार काँग्रेस सोडून जाणार नाही.

 

 

 

 

निवडणूकीत विरुद्ध पक्षांच्या इंडिया आघाडीला पूर्ण बहूमत मिळाले नसले तरी राष्ट्रीय लोकशाही अघाडीला सुद्धा केंद्र सरकार बनवण्यासाठी पुरेशा जागा मिळणार नाहीत.”

 

 

 

 

 

भाजपच्या ‘अब की बार ४०० पार’ या नाऱ्याला विरोध करत सिद्धारमय्या यांनी केंद्रात भाजपाशिवाय सरकार बनेल अशी आशा व्यक्त केली आहे. त्यांनी दावा केला आहे की, केंद्रात भाजपाच्या नेतृत्वाची एनडीए सरकार बनणार नाही.

 

 

 

सिद्धारामय्या म्हणाले, “माझ्या माहितीनुसार भाजपने केलेल्या सर्वेनुसार भाजप फक्त २०० पेक्षा जास्त जागा घेवू शकेल असे दिसून आले आहे. ते स्वत:च्या हिमतीने सत्तेत येणार नाहीत.

 

 

 

 

निवडणूकीनंतर सत्तेतील पक्षांची पून्हा युती होईल. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दक्षिणेतील प्रादेशिक पक्षांचे नेते एकत्र येवून सराकार स्थापन करतील.”

 

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ नंतर कोणतेच निवडणूक आश्वासन पूर्ण केले नसल्याचा दावा सिद्धारामय्या यांनी केला आहे. त्याशिवाय बेरोजगारी आणि महागाई हे सुद्धा प्रमुख मुद्दे आहेत.

 

 

 

लोकसभा निवडणूकीतील काँग्रेसच्या जागांवर बोलताना सिद्धारामय्या यांनी कर्नाटकामध्ये काँग्रेस १५ ते २० जागा जिंकेल अशी खात्री व्यक्त केली आहे.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *