पतंजलीच्या 14 उत्पादनांचा परवाना रद्द;विक्रीवर बंदी

14 Patanjali products license revoked; sales banned

 

 

 

 

रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण जवळपास एक महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात खेटा घालत आहेत. पतंजली आयुर्वेदच्या भ्रामक जाहिराती प्रकरणात सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर आज पुन्हा सुनावणी झाली.

 

 

यावेळी योगगुरु रामदेव बाबा आणि पंतजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण हे सुनावणीवेळी कोर्टात हजर होते.

 

 

 

न्यायालयाने दोघांना सुनवाणीला हजर राहण्यास सूट दिली. तर माफीनामा प्रसिद्ध केलेले वृत्तपत्र न्यायालयात जमा करण्याचे निर्देश दिले.

 

 

 

 

यापूर्वी 23 एप्रिल रोजी सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने पतंजली आयुर्वेदद्वारे वृत्तपत्रात दिलेला माफीनाफा खारीज केला होता. माफीनामा त्याच आकारात छापण्यात यावा, ज्या आकारात जाहिरात छापण्यात आली आहे,

 

 

 

असे न्यायालयाने निर्देश दिले होते. पतंजली आयुर्वेद लिमिटेड आणि दिव्य फार्मसीच्या 14 उत्पादनांचा परवाना उत्तराखंड राज्य परवाना प्राधिकरणाने रद्द केला आहे.

 

 

 

 

उत्तराखंड औषधी विभागाने पतंजलीच्या 14 उत्पादनांचा परवाना रद्द केला आहे. त्यामध्ये स्वासारी गोल्ड, स्वासारी वटी, ब्रोंकोम, स्वासारी प्रवाही, स्वासारी अवलेह,

 

 

 

 

मुक्त वटी एक्स्ट्रा पॉवर, लिपिडोम, बीपी ग्रिट, मधुग्रिट, मधुनाशिनी वटी एक्स्ट्रा पॉवर, लिवमृत ॲडव्हान्स, लिवोग्रिट, आईग्रिट गोल्ड, पतंजली दृष्टी आय ड्रॉप या औषधांचा समावेश आहे.

 

 

 

 

आता ही उत्पादनं बाजारात मिळणार नाही. पतंजली त्यांचे उत्पादन करु शकणार नाही आणि ही उत्पादनं विक्री पण करु शकणार नाही. या उत्पादनावर बंदी आल्याने ही उत्पादनं बाजारातून हटविण्यात आली आहे.

 

 

 

 

उत्तराखंड सरकारच्या औषधी विभागाने ही 14 उत्पादनं बंद करण्याचे आदेश दिले होते. अनेक ठिकाणाहून या उत्पादनाविषयी तक्रारी येत होत्या.

 

 

 

उत्पादन खपविण्यासाठी भ्रामक, दिशाभूल करणारी जाहिरात करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत होता. या तक्रारीनंतर केंद्रीय आयुष मंत्रालयाने कारवाईचे निर्देश दिले.

 

 

 

 

या उत्पादनाविषयी नोटीस देऊन सुद्धा ती तयार करण्यात येत होती. त्यामुळे औषधे आणि जादूचे उपाय कायदा 1954, औषधे आणि सौंदर्यप्रसाधनं कायदा 1945 चे वारंवार उल्लंघन झाल्याने ही कारवाई करण्यात आली.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *