महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला लिपस्टिक लावल्याने महापौरांनी दिली शिक्षा ; तडकाफडकी बदली

The mayor punished a female municipal employee for applying lipstick; Hasty replacement

 

 

 

सुंदर दिसण्यासाठी महिला सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. अनेक महिलांना लिपस्टिक लावयला आवडते. मात्र, याच लिपस्टिकमुळे महापालिकेच्या

 

महिला कर्मचाऱ्याची तडकाफडकी बदली झाली आहे. दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर महापौरांनीच या महिला कर्मचाऱ्याच्या बदलीचे

 

आदेश काढले आहेत. यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ग्रेटर चेन्नई महानगरपालिकेत हा प्रकार घडला आहे.

 

एस. बी. माधवी (वय 50 वर्षे) असे बदली झालेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. माधवी या ग्रेटर चेन्नई महानगरपालिकेत मार्शल म्हणून कार्यरत आहेत.

 

माधवी या ग्रेटर चेन्नई महानगरपालिकेच्या महापौर आर. प्रिया यांच्या शासकीय असिस्टंट देखील आहेत. महापौर आर. प्रिया यांनीच माधवी

 

यांची तडाफडकी बदली केली आहे. ट्रान्सफर ऑर्डरमध्ये बदलीचे जे कारण देण्यात आले आहे ते पाहून माधवी यांना धक्का बसला आहे.

 

भडक रंगाची लिपस्टिक लावल्याने माधवी यांची बदली करण्यात आली आहे. महापौर आर. प्रिया यांनी माधवी यांना लिपस्टिक लावून कार्यालयात येवू नये अशा सूचना केल्या होत्या.

 

मात्र, तरीही देखील माधवी या भडक रंगाची लिपस्टिक लावून येत होत्या यामुळे त्यांची बदली करण्यात आली आहे. माधवी यांची मनाली झोनमधील कार्यालयात बदली करण्यात आल्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

बदलीचे पत्र मिळाल्यानंतर माधवी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. महापौर आर. प्रिया यांनी माधवी यांना लिपस्टिक लावून कार्यालयात येवू नये असा सूचना दिल्या होत्या.

 

लिपस्टिक लावून कार्यालयात येवू नये असा सरकारी आदेश दाखवा असा सवाल माधवी यांनी महापौर आर. प्रिया यांना विचारला होता.

 

यानंतर काही वेळातच महापौरांनी बदली आदेश काढल्याचे माधवी म्हणाल्या. लिपस्टिक लावणे गुन्हा आहे का? लिपस्टिक लावून कामावर येवू नये अशा प्रकारच्या सूचना म्हणजे मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचे माधवी यांचे म्हणणे आहे.

 

माधवी यांची ट्रान्सफर ऑर्डर काढणाऱ्या महापौर आर. प्रिया यांनी याबाबत खुलासा केला आहे. भडक रंगाची लावून येवू नये अशा सूचना माधवी यांना करण्यात आल्या होत्या.

 

महिला दिनादरम्यान माधवी यांनी एका फॅशन शोमध्ये भाग घेतला होता यावरुन देखील टीका झाली होती. भड रंगाची लिपस्टिक खूपच उत्तेजक वाटते.

 

महापौर कार्यालयात मंत्री आणि दूतावासाचे अधिकारी येतात यामुळे अशा प्रकारचा हेट अप शोधत नाही. माधवी यांची बदली लिपस्टिक लावल्यामुळे करण्यात आली नसून यामागे अनेक कारणे आहेत

 

असा खुलासा महापौर आर. प्रिया यांनी केला आहे. कामावर उशीरा येणे, कामात निष्काळजीपणा, वरिष्ठांच्या सूचनांचे पालन न करणे अशी विविध कारणांमुळे माधवी यांची बदली करण्यात आल्याचे महापौर आर. प्रिया म्हणाल्या.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *