महाराष्ट्र निवडणुकीत EVM धांदली बाबत काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
Congress leader makes big claim about EVM rigging in Maharashtra elections

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमधील मतदानातील तफावत सध्या कळीचा मुद्दा झाला आहे. अनेक गावात मतदारांपेक्षा मतदानाचा टक्का अधिक असल्याचे समोर आल्याने विरोधकांच्या संशयाला जागा मिळत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
72 लाख मते कधी आणि कशी वाढली असा निशाणा नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर साधला आहे. महाविकास आघाडीतून निवडणूक आयोगावर हल्ले वाढले आहेत.
तर दुसरीकडे पराभूत उमेदवारांनी आता फेर मतमोजणीचा पर्याय निवडला आहे. त्यासाठी मोठी रक्कमही मोजली आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराजबाबा यांनी पण मोठा बॉम्ब टाकला आहे.
जे निकाल लागले आहेत ते अनपेक्षित होते. मी जवळ जवळ 7 सार्वत्रिक निवडणुका लढलो आहे. कार्यकर्ताना अंदाज येत असतो, असे ते म्हणाले.
लोकशाही वाचवण्यासाठी बाबा आढाव यांनी आंदोलन केलं. बाबा आढाव यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी मी मुंबईहून येथे आल्याचे त्यांनी सांगीतले.
5 महिन्यापूर्वी महाविकास आघाडीला मोठ्या जागा मिळाल्या होत्या. पण विधानसभेला इतका मोठा बदल होईल असं दिसत नाही, असे चव्हाण म्हणाले.
प्रत्येकाला आत्मविश्वास होता सत्ता बदल होणार आहे. पक्ष फुटीचा जो विषय झाला त्याचा काहीच फरक पडला नाही याचा विश्वास बसत नाही. देशात लोकशाही आहे. निवडणुक फ्री आणि फेअर होणं आवश्यक आहे.
पंतप्रधानानी निवडणूक आयुक्त बदलण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्हाला अंदाज आला होता. द्वेष पसरवणारी भाषण मोदी योगी यांचे कडून करण्यात आली त्यांच्यावर कारवाई केली नाही.
निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. Evm मशीनवर जनतेचा विश्वास राहिला नाही. फेर पडताळणीचा मला वाटतेय काही फायदा होणार नाही, असे ते म्हणाले.
माझी मागणी आहे, सर्वच्या सर्व VVPAT च्या चिठ्या मोजायला हव्यात अशी मागणी त्यांनी केल. सरकार घाबरत असल्यानेच जनतेचा संशय बळावत असल्याचा आरोप त्यांनी केला.
निवडणूक आयोगाने EVM मशीन तपासणीसाठी दिल्या पाहिजे. आंतरराष्ट्रीय समिती तपासणी केली पाहिजे. ईव्हीएम मशीन हातात भेटलं पाहिजे.
त्या मशीन मध्ये काही गुप्त कोड आहे का ह्याची तपासणी झाली पाहिजे. जागतिक तज्ज्ञाकडून त्याची तपासणी झाली पाहिजे. त्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
लोकशाहीचा यांनी मूडदा पाडला आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला. निवडणुकीत पोलिसांचा गैरवापर केला गेलाय… पोलिसांकडून मतदान करून घेतलं.
निवडणूक आयोग बोलवणार आणि लांबून मशीन दाखवणार आणि विचारणार पुरावा दाखवा. 5 टक्के मत मोजून काय फायदा होणार नाही.
आपल्या हातात मशीन नाही. या मशीनमध्ये काही गुप्त कोड, प्रोगाम फीट केला आहे का? हे तपासावं लागणार तरच खरी माहिती समोर येईल असे चव्हाण म्हणाले.
यापूर्वी उद्धव ठाकरे यांना भाजपाला फसवलंय. एकनाथ शिंदे यांना फसवू नये असं वाटत होतं पण तस झाले आहे, असा टोला त्यांनी लगावला.
मी उपोषण केलंय. मी 1952 सालापासून निवडणुका पाहतोय. मी येवढा पैश्याचा वापर कधी पहिला नाही माला हे अजब वाटत. अदानींना अमेरिकेतली कोर्टात पकड वॉरंट काढलं आहे.
निवडणुकीतील तांत्रिक दोष हा माझ्यासाठी गौण आहे. पण परिकीय हस्तक्षेप झालाय का नाही? मोदी कित्येक दिवस पत्रकारांसोबत बोलायला देखील तयार नाहीत.
सरकारने एकदा आयोग नेमला पाहिजे आणि तपास केला पाहिजे. परकीय हस्तक्षेप आतापर्यंतच्या निवडणुकीत कधी झालाय का? हे सरकार मस्तावले आहे. हे धोकादायक आहे, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांनी केले आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन चकीत करणारे आकडे समोर आले आहेत. महाविकास आघाडीची सपाटून हार झाली आहे. अशातच यंदा राज्यभरातील मतटक्का वाढला आहे.
महिलांनी यंदा भरभरुन मतदान केले आहे. तसेच सायंकाळी पाच वाजल्यानंतरही अनेक मतदानकेंद्रांवर रांगा लागल्या होत्या. यामुळे काँग्रेसकडून निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी निवडणूक आयोगाकडे वाढीव मतटक्क्याचे पुरावे मागितले आहेत. पटोलेंनंतर आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही ईव्हीएमविरोधात मास्टरस्ट्रोक टाकला आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ५ महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या जागा मिळाल्या होत्या. पण विधानसभेत इतका कल बदलेल अशी परिस्थिती दिसत नाही.
महाविकास आघाडीसह जनतेला आत्मविश्वास होता की, यावेळी सत्ताबदल होणार. पण आश्चर्य वाटतं की, पक्षफुटीच्या विषयाचा निवडणुकीत काहीच फरक पडला नाही. देशात लोकशाही आहे. निवडणुक फ्री आणि फेअर होणे आवश्यक आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढे ईव्हीएमवरुन निवडणूक आयोगाला धारेवर धरले. ते म्हणाले, पंतप्रधानानी निवडणूक आयुक्त बदलण्याचा निर्णय घेतला तेव्हाच आम्हाला अंदाज आला होता,
काहीतरी गडबड आहे. द्वेष पसरवणारी भाषण मोदी योगी यांच्याकडून करण्यात आली आहेत, त्यांच्यावर आयोगाने कारवाई केली नाही. निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे कारवाई करणे.
ईव्हीएम मशीनवर जनतेचा विश्वास राहिला नाही. पण आता फेर पडताळणीचा मला तरी वाटतंय काही फायदा होणार नाही.’ यासोबतच चव्हाणांनी सर्वच्या सर्व VVPATच्या चिठ्या मोजायला हव्यात अशी मागणी देखील केली आहे.
पृथ्वीराज चव्हाणांनी पुढे पुन्हा ईव्हीएम तपासणीच्या मुद्द्यांवर भर दिला. ‘निवडणूक आयोगाने EVM मशीन तपासणीसाठी दिल्या पाहिजेत. आंतरराष्ट्रीय समिती नेमून मशीनची तपासणी केली पाहिजे.
ईव्हीएम मशीन हातात भेटले पाहिजे. त्या मशीनमध्ये काही गुप्त कोड आहे का? याचीही तपासणी व्हायला हवी. जागतिक तज्ज्ञांकडून त्याची तपासणी झाली पाहिजे. त्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
यासोबतच पृथ्वीराज चव्हाणांनी सत्ताधारी आणि निवडणूक आयोगावरही निशाणा साधला आहे. ‘लोकशाहीचा यांनी मूडदा पाडला आहे,’ असा घणाघाती आरोप चव्हाणांनी केला.
तर ते पुढे म्हणाले, ‘निवडणुकीत पोलिसांचा गैरवापर केला गेला आहे. पोलिसांकडून मतदान करून घेतले. निवडणूक आयोग बोलवणार आणि लांबून मशीन दाखवणार आणि विचारणार पुरावा दाखवा.
५ टक्के मतं मोजून काही फायदा होणार नाही. आपल्या हातात मशीन नाही. या मशीनमध्ये काही गुप्त कोड, प्रोगाम फीट केला आहे का? हे तपासणे गरजेचे आहे.’
तर ‘यापूर्वी उद्धव ठाकरे यांना भाजपाने फसवले.आता एकनाथ शिंदेंना फसवू नये असे वाटत होते, मात्र तसे चित्र दिसत नाही, असा टोला देखील चव्हाणांनी लगावला.