जगातील सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली नेता म्हणाला EVM हॅक होऊ शकते ; पुन्हा चर्चेला तोंड फुटले
World's richest and most powerful leader said EVMs can be hacked; The discussion broke out again
नुकत्याच हरियाणा आणि जम्मू -काश्मीरमध्ये निवडणूका झाल्या आहेत. तर महाराष्ट्र आणि झारखंड येथे येत्या महिन्यात निवडणूका आहेत.हरियाणाच्या निवडणूकांचे निकाल धक्कादायक आहेत.
त्यामुळे पुन्हा ईव्हीएमबाबत संशयाचा धूर येत आहे. परंतू निवडणूक आयोगाने मात्र ईव्हीएम कोणत्याही परिस्थितीत हॅक होत नाही असे स्पष्ट केले आहे. तरीही अधून मधून त्यावर संशय घेतला जातच असतो.
कॉंग्रेसने देखील ईव्हीएम मशिनवर संशय घेतला होता. परंतू निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशिन कशासी कनेक्ट नसल्याने हॅक होऊ शकत नसल्याचे म्हटले आहे.
अशात आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या अब्धाधीश आणि स्पेसएक्सचे सीईओ इलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा ईव्हीएम आपली टीपण्णी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेचा तोंड फुटले आहे.
इलॉन मस्क यांनी म्हटले की मी एक टेक्निशियन आहे. आणि मी केवळ हे सांगू इच्छीतो की ईव्हीएमने व्होटींग केली जाऊ नये, कारण ईव्हीएम हॅक केले जाऊ शकते.
ईव्हीएम कॉंप्युटर प्रोग्रॅमिंगशी जोडलेले असते. आणि त्यास हॅक करणे शक्य आहे.त्यांच्या या वक्तव्याला महत्व आहे, कारण ते सतत संशोधकांसोबत निरनिराळ्या प्रोजेक्टवर काम करीत आहेत.
इलॉन मस्क यांच्या वक्तव्यानंतर कॉंग्रेसने पुन्हा या मु्द्द्याला धरुन सोशल मिडीयावर चर्चा सुरु केली आहे. कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी एक्सवर ( पूर्वीचे ट्वीटर ) पोस्ट केल्या आहेत. त्यात ते म्हणतात की ईव्हीएम हॅक केले जाऊ शकते. आता सांगा इलॉन मस्क खोटे बोलत आहेत.
या वर्षांच्या जून महिन्यात देखील इलॉन मस्क यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करीत ते हॅक केले जाऊ शकते असे म्हटले होते. तेव्हा लोकसभेच्या निवडणूका होत्या.
तेव्हा कॉंग्रेसने याचा वापर करीत टीका केली होती. त्यावेळी भाजपाच्या वतीने मंत्री चंद्रशेखर यांनी आपल्या येथे इंटरनेट कनेक्टेट ईव्हीएम नसल्याने त्याला हॅक करणे शक्य नाही.
जर ते इंटरनेट कनेक्टेट असते तर ते हॅक झाले असते. त्यानंतर हे प्रकरण शांत झाले होते. परंतू ईव्हीएम हॅकचे संशयाचे भूत पुन्हा एकदा बाटलीच्या बाहेर आले आहे.