युक्रेनकडून रशियाची राजधानी मॉस्कोवर सर्वात मोठा हल्ला

The biggest attack on Russia's capital Moscow from Ukraine

 

 

 

रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात आता एक मोठी अपडेट आली आहे. युद्धाला सुरुवात झाल्यापासून

 

आतापर्यंत युक्रेनने मॉक्सोवर सर्वोत मोठा हल्ला केल्याचे वृत्त आहे. रविवारी युक्रेनने किमान ३४ ड्रोनच्या मदतीने मॉक्सोवर हल्ला केला.

 

२०२२मध्ये सुरू झालेल्या या युद्धात रशियाच्या राजधानीवर झालेला हा सर्वात मोठा ड्रोन हल्ला असल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्यानंतर रशियातील ३ मुख्य विमानतळावरील वाहतूक अन्य ठिकाणी वळवण्यात आली आहे.

 

युक्रेनने केलेल्या या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाल्याचे समजते. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून ३ तासात राजधानीसह अन्य ठिकाणचे मिळून ३६ ड्रोन नष्ट केले.

 

मॉस्को आणि त्याच्या परिसरातील भागात किमान २.१ कोटी लोकांची लोकवस्ती आहे. युक्रेनने दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यानंतर रशियाकडून रात्री १४५ ड्रोनचे हल्ले झाले.

 

हवाई सरंक्षण विभागाने त्यापैकी ६२ ड्रोन पाडून टाकले. काही अधिकाऱ्यांच्या मते युद्धच्या सुरुवातीच्या दिवसानंतर आता रशियाचे सैन्य वेगाने पुढे जात आहे.

 

तर अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते डोनाल्ड ट्रंम्प यांच्या विजयाने दोन वर्षाहून अधिक काळ सुरू असलेलेय युद्ध आता अंतिम टप्प्यात पोहोचेल.

युक्रेनने फक्त मॉक्सोवर हल्ला केला नाही तर शहराच्या पश्चिम भागात असलेल्या एका केमिकल कारखान्यावर देखील ड्रोन हल्ले केले. रशियाच्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या हल्ल्याचे खंडन केले.

 

सिक्योरिटी सर्व्हिस ऑफ युक्रेन (SBU)च्या रिपोर्टनुसार अलेस्किंस्की केमिकल प्लॉटवर १३ युक्रेन ड्रोनच्या माध्यमातून हल्ले झाले. यामुळे तेथे मोठा स्फोट झाला. हल्ल्यानंतर धुरामुळे तेथील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले.

SBUचे मुख्य टार्गेट दारूगोळा तयार करणारा कारखाना होता. पण अॅसिड रिलीझ होण्याच्या कारणामुळे नारंगी रंगाचा धूर आला. सीएनएनच्या रिपोर्टनुसार अलेक्सिंस्काया थर्मल पॉवर प्लॉटचे नुकसान झाले आहे.

 

येथील ११० केव्ही विजेच्या ट्रान्समिशन लाइनचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर येथे झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

 

SBU आणि स्पेशल ऑपरेशन फोर्सकडून झालेला हल्ला या व्हिडिओमध्ये दिसतोय. ही घटना मॉक्सोपासून २०० किलोमीटर दक्षिणेत झाली आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *