अजितदादांनी दिला कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याचा कानमंत्र

Ajitdada advised the workers to fight on their own.

 

 

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. दिवाळीनंतर कोणत्याही क्षणी या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

 

हीच बाब लक्षात घेऊन राजकीय पक्ष कामाला लागेल आहे. तसेच पदाधिकाऱ्यांकडूनही जोमात तयारी केली जात आहे. काही ठिकाणी तर नेते, पदाधिकारी स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.

भाजप मंत्र्याने ‘लक्ष्मण हाके यांना सुनावले म्हणाले ,लुडबुड करु नये

असे असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीला पहिला दणका देण्याच्यात तयारीत आहेत. पुण्यात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचा आदेश दिला आहे.

 

राज्यात मुंबई महापालिकेप्रमाणेच पुणे महानगरपालिकेलाही तेवढेच महत्त्व आहे. ही पालिका अजित पवार यांच्यासाठी फार महत्त्वाची आहे. एका अर्थाने पुणे पालिका अजितदादांसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे.

ट्रम्प यांचा नवा दावा;भारत-पाकिस्तानने एकमेकांची ७ विमाने पाडली

त्यामुळेच ते ही निवडणूक जिंकण्यासाठी आतापासूनच तयारीला लागले आहेत. पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सूचना देण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. अशाच एका बैठकीत अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आदेशामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

 

पुणे दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी माजी नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पुणे पालिकेच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला.

भाजप मंत्र्याने ‘लक्ष्मण हाके यांना सुनावले म्हणाले ,लुडबुड करु नये

पुणे पालिका हद्दीत प्रभागांची रचना भाजपा, शिंदे यांच्या शिवसेनेला पुरक ठरेल अशी करण्यात आल्याचा आरोप अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

 

त्याबाबतही अजितदादांनी आपल्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. प्रभागरचनेला आव्हान देण्यासाठी आपण न्यायालयात जाणार नाहीत.

नांदेड जिल्ह्यातील पाच हजारांहून अधिक नागरिक सुरक्षितस्थळी, सैन्यदलाची बटालियन दाखल

कोणतीही तक्रार न करता निवडणुकीच्या कामाला लागा असा आदेशच अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

तसेच, पुणे पालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढवली जाणार की अजितदादा स्वबळाचा नारा देणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

 

याच बैठकीत अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आणखी एका आदेशामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पदाधिकाऱ्यांनी सर्वच जागांसाठी तयारी करावी, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे सोबत पहिलीच चर्चा निष्फळ

त्यामुळे अजित पवार यांची स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठीही कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असा संदेशच एका प्रकारे दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

 

 

Related Articles