इंडिगोची 80 उड्डाणं रद्द,काय घडले कारण ?
80 IndiGo flights cancelled, what was the reason?

देशातील आघाडीची खासगी विमान कंपनी असणाऱ्या इंडिगोची विमान उड्डाणे रद्द होण्याचे सत्र अद्याप कायम आहे. इंडिगोची एकूण 80 विमान उड्डाणे सोमवारी रद्द करण्यात आली.
उमेदवारी न मिळाल्याने पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न
यातील निम्मी उड्डाणे ही दिल्ली विमानतळावरून नियोजित होती. ही उड्डाणे खराब हवामानामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती इंडिगोतर्फे प्रवाशांना एका विशेष सूचनावलीद्वारे देण्यात आली.
शक्तिशाली ‘बॉम्ब’ चक्रीवादळ ; 48 तास धोक्याचे
‘दिल्लीव्यतिरिक्त मुंबई, बेंगळुरू, कोचिन, हैदराबाद, कोलकाता, अमृतसर, चंडिगड, जयपूर, देहराडून, इंदूर, पाटणा, भोपाळ आदी विमानतळांवरील नियोजित उड्डाणे रद्द करण्यात आली’,
मोठी बातमी; शिंदेसेना–भाजप युती तुटली
असे इंडिगोच्या वेबसाइटवर नमूद करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी 11 वाजून 20 मिनिटांनी इंडिगोने प्रवाशांसाठी एक सूचनावली प्रसृत केली.
शरद पवार म्हणतात “साखरेचे दर वाढवा” कारखान्यांना नुकसान होतेय
‘दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक विमानतळांवर सोमवारी सकाळी धुके पसरले होते. धुक्यामुळे दृश्यमानता खालावल्याने सकाळच्या सत्रातील काही उड्डाणे रद्द करण्यात आली.
दुपारपर्यंत या धुक्याचा प्रभाव कायम रहाण्याची शक्यता असून दुपारनंतरही काही उड्डाणे रद्द होऊ शकतील, अथवा काही उड्डाणे विलंबाने होतील’, असे यात म्हटले होते.
भाजपने नगरपरिषद निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या 16 पदाधिकाऱ्यांना केले निलंबित
दिल्ली विमानतळावरील एकूण 128 विमानसेवा सोमवारी धुक्यामुळे रद्द करण्यात आल्या. यामध्ये या विमानतळावर येणाऱ्या व तेथून उड्डाण करणाऱ्या प्रत्येकी 64 सेवांचा समावेश होता.
याशिवाय, दोनशे उड्डाणे विलंबाने रवाना झाली व आठ विमानांचा मार्ग वळवण्यात आला, अशी माहिती विमानतळ व्यवस्थापनाने दिली. उशिरा मार्गस्थ झालेल्या उड्डाणांचा सरासरी विलंब कालावधी 24 मिनिटांचा होता.
जगाचा अंत जवळ आला? पैगंबरांची ‘ती’ भविष्यवाणी पुन्हा जिवंत;पाहा VIDEO
दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडतर्फे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन पाहिले जाते. या विमानतळावरून दररोज सुमारे तेराशे विमानसेवा हाताळल्या जातात.









