मंदिरात चेंगराचेंगरी; 8 महिलांचा दुर्दैवी मृत्यू

Stampede at Temple; 8 Women Tragically Die

 

 

बिहारच्या नालंदा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नालंदा येथील शीतळा देवी मंदिरामध्ये भाविकांची चेंगराचेंगरी झाली आहे.

 

या चेंगराचेंगरीत किमान आठ महिलांचा मृत्यू झाला असून १२ हून अधिक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दर मंगळवारी शीतळा देवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी जमते.

घराबाहेर पडणे टाळा,29, 30 आणि 31 मार्चला मोठा धोका,

आज चैत्र महिन्याचा शेवटचा मंगळवार असल्याने गर्दी आणखी वाढली होती. अचानक चेंगराचेंगरी झाली, त्यामुळे लोक पळून जाऊ लागले मात्र यामुळे अनेक महिला चिरडून मरण पावल्या आहेत.

 

या घटनेची माहिती मिळताच, उपविभागीय दंडाधिकारी (एसडीपीओ) आणि जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. चेंगराचेंगरीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सरसगट सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही :पात्रतेबाबत अजूनही संभ्रम

मीडिया रिपोर्टनुसार,अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि पोलिसांचा अपुरा फौजफाटा यामुळे भाविक जास्त घाबरले आणि पळू लागले.

 

चेंगराचेंगरी झाल्यानंतर पोलीस आणि प्रशासकीय कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमध्ये 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामध्ये दोघांची ओळख पटली आहे.

आता पेट्रोल-डिझेल साठी ॲपवर बुकिंग आवश्यक

यामध्ये रीटा देवी (५०), दिनेश राजक यांच्या पत्नी, रा. शकुंत आणि रेखा देवी (४५), कमलेश प्रसाद यांच्या पत्नी, रा. नूरसराई, मथुरापूर अशी चेंगराचेंगरी झालेल्या मृतांमधील दोघींची ओळख पटली आहे.

 

घटनेमध्ये जखमी झालेल्या भाविकांना उपचारासाठी मॉडेल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा भीषण अपघात चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला (शीतला अष्टमी), शेवटच्या मंगळवारी घडला. आजच्या दिवशी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती.

 

शालार्थ आयडी घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरातचा हात?
मिळालेल्या माहितीनुसार, बिहार शरीफपासून सुमारे ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मघरा गावात, शीतला अष्टमीच्या दिवशी घरातील चूल न पेटवण्याची आणि आदल्या दिवशी तयार केलेले थंड (शिळे) अन्न देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करण्याची पारंपरिक प्रथा आहे.

 

अष्टमीच्या दिवशी मंदिरात लांबच लांब रांगा लागतात, ज्यामुळे प्रचंड गर्दी होते आणि चेंगराचेंगरीचा धोका निर्माण होतो. बिहारमधील नालंदामध्ये ही घटना घडली. यामुळे भाविकांसाठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

१ एप्रिलपासून RBI कडून ऑनलाइन पेमेंटच्या नियमांत बदल

भारतातील जनगणेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त, मृत्युंजय कुमार नारायण यांनी २०२७ च्या जनगणनेसंदर्भात पत्रकार परिषद घेतली.

 

यावेळी बोलताना ते म्हणाले, “जनगणनेची तयारी आता प्रगत टप्प्यावर पोहोचली आहे आणि अवघ्या काही दिवसांतच अनेक राज्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील – घरांची यादी आणि गृहगणना – क्षेत्रीय कामाला सुरुवात होईल. जनगणना दोन टप्प्यांत घेतली जाते आणि यावेळी माहिती संकलन डिजिटल पद्धतीने केले जाईल.”

रविवार असतानाही तब्बल १०३ निर्णय जाहीर

“या प्रक्रियेत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश महत्त्वाची भूमिका बजावतात. जमिनीवरील काम पूर्ण करण्यासाठी त्यांची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली जाते. शेवटची जनगणना २०११ मध्ये झाली होती.

 

स्वातंत्र्यानंतरची ही आठवी जनगणना आहे. ही जनगणना पूर्णपणे गोपनीय असून तिची माहिती आरटीआयद्वारेही सार्वजनिक केली जाणार नाही.

ट्रम्पच्या डेप्युटीने इराण युद्धावरुन PM नेतान्याहूंना सुनावलं

राज्य सरकारची यंत्रणा ही जनगणना प्रक्रिया पार पाडेल. ही जनगणना प्रक्रिया गृहमंत्री यांच्या नेतृत्वाखाली पार पाडली जाईल, ज्यांचे मंत्रालय राज्याच्या मुख्य सचिवांना निर्देश जारी करेल.” असंही मृत्युंजय कुमार नारायण यांनी स्पष्ट केलं.

 

Related Articles