विधान परिषद निवडणूक ;उमेदवाराच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांनी बोलावली बैठक

Legislative Council Election: Sunetra Pawar Calls Meeting to Discuss Candidate

 

 

विधान परिषदेच्या जागेसाठी कुणाला संधी द्यायची यावरून सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रणकंदन सुरू असताना राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या पोस्टची किंबहुना सुचवलेल्या पर्यायाची राज्यात चर्चा सुरू आहे.

राहुल गांधीं RSS ला म्हणाले ‘राष्ट्रीय सरेंडर संघ’ काय घडले कारण ?

विधान परिषदेच्या जागेसाठी अजित पवार यांच्यासारख्याच विश्वासू माणसाला संधी मिळावी असे म्हणत त्यांनी जय पवार यांचे नाव पुढे केले आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी संध्याकाळी कोअर कमिटीची बैठक होणार आहे. बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

VIDEO;दिल्ली विमानतळावर उड्डाणाच्या काही क्षणांपूर्वीच विमानाला आग

बैठकीत इच्छुक उमेदवारांच्या नावांवर चर्चा होणार आहे. पक्षात विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, झिशान सिद्धकी आणि राजेंद्र जैन यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. त्याआधीच अमोल मिटकरी यांनी जय पवार यांच्या नावाचा विचार व्हावा, असे सुचवले आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी कार्यकर्ते आणि नेत्यांच्या जवळच्या लोकांची लॉबिंग आणि चढाओढ पाहता आगामी काळात राज्यभर पक्ष वाढीसाठी अजितदादांसारखा विश्वासू आणि युवा चेहरा पुढे आणण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थिती जय पवार हे नाव या जागेसाठी सर्वोत्तम आहे, असे अमोल मिटकरी म्हणाले.

१ मे पासून एसटीचे अभियान‘;आपली बस, आपली सेवा’

कदाचित इतरांना घराणेशाही वाटेल, ते वाटू देत मात्र दादांनंतर भविष्यात हा चेहरा महाराष्ट्रासाठी दादांसारखाच आश्वासक वाटतो. दादांची उणीव भरून करण्याची क्षमता असलेला हा चेहरा राष्ट्रवादी पक्षासाठी संजीवनी ठरेल..अर्थात अंतिम निर्णय पक्षाचा! असेही अमोल मिटकरी म्हणाले.

 

आता लाडक्या बहिणींना मोठा दणका! होणार थेट करवाई

पक्षात विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, झिशान सिद्धकी आणि राजेंद्र जैन यांच्या नावांची चर्चा सुरू असून विक्रम काकडे हे माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव आहेक तर सुरेश बिराजदार हे धाराशिव जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. राजेंद्र जैन पक्षाचे माजी विधान परिषद आमदार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय आहेत.

 

जो बीत गया है वो अब दौर ना आयेगा| इस दिलमे सिवा तेरे कोई और न आयेगा| घर फुंक दिया हमने अब राख उठानी है| जिंदगी और कुछ नही तेरी मेरी कहानी है|| असे ट्विट करून अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या आठवणी जागवल्या.

8 व्या वेतन आयोगात शिक्षकांची १.३४ लाख रुपयांपर्यंतची बेसिक सॅलरीची मागणी

Related Articles