उद्या 12 वी परीक्षेचा निकाल
The 12th-grade exam results are tomorrow.

गेल्या दोन ते अडीच महिन्यांपूर्वी झालेल्या दहावी आणि बारावीच्या (HSC Results 2026) परीक्षांच्या निकालाची प्रतिक्षा विद्यार्थ्यांसह पालकांनीही लागली आहे.
नुकतेच सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. राज्याचं लक्ष लागलेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने दिली असून उद्या 2 मे रोजी सकाळी 11 वाजता पुणे कार्यालयात राज्यातील बारावी परीक्षांचा निकाल जाहीर होत आहे.
गॅस सिलिंडरच्या दरात एकाच दिवसात 993 रुपयांची वाढ; राहुल गांधीं
त्या पार्श्वभूमीवर बोर्डाचे तयारी पूर्ण झाली असून पालकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विद्यार्थी आपला निकाल mahresult.nic.in, mahahsscboard.in तसेच इतर अधिकृत संकेतस्थळांवर पाहू शकतात.
बोर्डाकडून उद्या 2 मे रोजी सकाळी 11 वाजता एकूण निकाल जाहीर केला जाणार आहे, मात्र विद्यार्थ्यांना त्यांचा व्यक्तिगत निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाईन पाहाता येईल. त्यासाठी, mahresult.nic.in, mahahsscboard.in या संकेतस्थळावर हा निकाल दिसून येईल.
निवडणूक संपताच महागाईचा भडका, LPG सिलेंडरच्या दरात 1000 रुपयांची वाढ
यासह इतरही अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहाता येईल. त्यानंतर, शाळेतूनच विद्यार्थ्यांना निकालाची ओरिजनल प्रति मिळवता येणार आहे. दरम्यान, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या 12 वीच्या परीक्षेसाठी यंदा सुमारे 14 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका डाउनलोड करता येईल तसेच पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी ती महत्त्वाची ठरणार आहे.
एकनाथ शिंदे वाचाळवीर मंत्र्यांना देणार डच्चू ?
निकाल इथे पाहता येणार? (Where can check HSC 12th result 2026)
https://results.digilocker.gov.in
https://mahahsscboard.in
https://hscresult.mkcl.org
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker App मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in महाविद्यालयांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
उमेदवारी न मिळाल्याने अजितदादांचा निकटवर्तीय राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत
ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरुन
स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी रविवार दिनांक 03/05/2026 से रविवार दिनांक 17/05/2026 पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल.
अमेरिकेने आता चीनकडे मोर्चा वळवला! रशिया संतापला, भारताची सुद्धा चिंता वाढली;
त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/ Credit Card/UPI/ Net Banking याद्वारे भरता येईल. फेब्रुवारी-मार्च 2026 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे.
छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्याथ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
आता लाडक्या बहिणींना मोठा दणका! होणार थेट करवाई









