थेट कलेक्टरलाच अटक,मराठवाड्यात खळबळ ;काय आहे प्रकरण

Collector Himself Arrested: Uproar in Marathwada—What Is the Case?

 

 

बीड जिल्ह्यातील एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. बीड जिल्ह्यातील महसूल घोटाळ्यात एक मोठा मासा गळाला लागला आहे.

 

बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन आणि मावेजा वाटपातील कोट्यवधी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणात अखेर मोठी कारवाई करण्यात आली आहे. बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना पोलिसांनी लातूरमधून अटक केली आहे.

एकनाथ शिंदें हेलिकॉप्टर अपघातातून बचावले
अविनाश पाठक हे बीडचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी महामार्गासाठी भूसंपादन करत असताना शेतकऱ्यांच्या नावाखाली तब्बल ७३ कोटींचा कथित गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

 

त्यांची अलीकडेच एसआयटीकडून चौकशी करण्यात आली होती. चौकशीनंतर लातूर येथील त्यांच्या घरातून त्यांना अटक करण्यात आली आहे.

11 राज्यांना IMD चा हाय अलर्ट, मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट

बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला वाढवून देण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या नावाने कथित बनावट आदेश तयार करून शासनाची ७३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तपासाला वेग आला आहे.

 

शुक्रवारी अविनाश पाठक यांना बीडच्या पोलिस अधीक्षक कार्यालयात नोटीस देऊन चौकशीसाठी पाचारण केले होते. जवळपास एक तास चाललेल्या या प्रक्रियेत पोलिसांनी त्यांच्या सह्यांचे सहा नमुने घेतले असून, येत्या दोन दिवसांत त्यांचा सविस्तर जबाब नोंदवला जाणार आहे.

सुनेत्रा पवार 2029 मध्ये मुख्यमंत्रि‍पदाच्या उमेदवार,जय पवरांच्या वक्तव्याने भाजपात खळबळ

अविनाश पाठक हे २२ एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकारी पदावरून बदली होऊन गेले होते. त्यांच्या कार्यकाळातील मागच्या तारखा (१ मार्च ते १७ एप्रिल २०२५) वापरून बनावट आदेश काढून गैरव्यवहार केल्याचा दावा पाठक यांचा आहे.

 

या आदेशांद्वारे १५४ प्रकरणांमधील वाढीय मोबदला तब्बल २४१ कोटी ६२ लाख रुपयांनी वाढवण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे, यातील ७३ कोटी ४ लाख रुपयांचे वाटपही संबंधित खातेदारांना करण्यात आलं आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर बंगालमध्ये हिंसाचाराचा भडका

या प्रक्रियेत कोणतीही अधिकृत नोंदवही ठेवण्यात आली नव्हती. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती. तर तीन वकिलांना १५ जानेवारीपर्यंत दिलासा देण्यात आला होता. या घोटाळ्यात महसूल कर्मचारी आणि वकिलांसह एकूण दहाजणांवर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

संजय हांगे (सहायक महसूल अधिकारी), त्र्यंबक पिंगळे (कंत्राटी कर्मचारी), शेख अजहर शेख बाबू (कंत्राटी कर्मचारी) हे अटक आहेत. अॅड. नन्नवरे, अॅड. पिसुरे, अॅड. प्रवीण राख आणि अॅड. नरवाडकर यांना १५ जानेवारीपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला आहे, तर पांडुरंग पाटील, राऊत आणि अविनाश चव्हाण हे फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.

पश्चिम बंगालच्या निकालावरून संजय राऊत म्हणाले,दिवा विझताना अधिक फडफडतो

पोलीस उपअधीक्षक पूजा पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आतापर्यंत १२२ शेतकऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. आरोपीच्या मोबाइलमधील कॉल रेकॉर्डिंग आणि आवाजाचे नमुनेही तपासले जात आहेत. पाठक यांच्या सह्यांचे नमुने घेतल्यामुळे आता बनावट आदेशांवरील सह्या आणि मूळ सह्यांची पडताळणी केली जाणार आहे.

 

Related Articles