आता तुतारीचे खासदार ‘लक्ष्य’: शरद पवार गट
Now, ‘Tutari’ MPs are the target: Sharad Pawar faction


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संसदीय पक्षातील फूट यशस्वी केल्यानंतर आता पुढील लक्ष्य हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असणार आहे.
या गटाचे राजकीय ऑपरेशन करण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर दिली जाण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाच्या ८ पैकी किमान सहा खासदारांना गळाला लावण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.
जयपूरहून बंडखोर 6 खासदार आज संध्याकाळी गोरेगावच्या हॉटेलमध्ये दाखल होणार
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे लोकसभेतील दोन तृतीयांश संख्याबळ सिद्ध करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शिवसेना ठाकरे गटात फूट पाडण्यात आली. त्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली.
ही फूट कायद्याच्या कसोटीवर टिकल्यानंतर लगेचच शरद पवार गटाच्या खासदारांना वळविण्याचे प्रयत्न होणार आहेत. हे प्रयत्न अजित पवार गटाच्या नेत्यांमार्फत होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शिवसेना ठाकरे गटाचा शेवटचा डाव बंडखोर खासदार अडचणीत?
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लोकसभेत आठ खासदार आहेत.त्यात सुप्रिया सुळे (बारामती), अमोल कोल्हे (शिरूर), नीलेश लंके (अहिल्यानगर), भास्कर भगरे (दिंडोरी), धैर्यशील मोहिते-पाटील (माढा). बजरंग सोनावणे (बीड), सुरेश म्हात्रे (भिवंडी) आणि अमर काळे (वर्धा) यांचा समावेश आहे.
यापैकी सुळे आणि कोल्हे वगळता अन्य खासदार शरद पवार गटाची साथ सोडू शकतात किंवा कसे याची चाचपणी सध्या सुरु आहे. ही चाचपणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष मोहिमेला वेग दिला जाण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंच्या मदतीला आले शरद पवार ,घेतला मोठा निर्णय
भाजपच्या पाठबळाने लोकसभा खासदारांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न होऊ शकतात याची कल्पना शरद पवारांना आहे. त्यादृष्टीने पवार यांनी संभाव्य राजकीय संकटाला तोंड देण्याची तयारी केल्याचे समजते. याशिवाय पक्षाचे नेते खासदारांच्या संपर्कात असून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.








