महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार ;कोणाला मिळणार डच्चू
Cabinet expansion in Maharashtra: Who will get the axe?

गेल्या काही काळापासून राज्यासह केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच आता राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे.
लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता असून नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी धनंजय मुंढे यांच्यासह सुनील शेळके आणि राजू नवघरे यांचा मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
विश्वसनीय सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे आता संपूर्ण राज्याचे लक्ष आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पुढील 4 दिवसात राज्यात मुसळधार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंढे आणि सुनील शेळके यांची कॅबिनेटमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातून राजू नवघरे यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
तर मंत्री नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद जाणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. झिरवळ यांच्यासह इतरही काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीतूनच सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान
धनंजय मुंढे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये मुंढे यांची वर्णी लागली होती,
मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता, मात्र आता त्यांचा समावेश पुन्हा एकदा मंत्रिमंडळात केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हवामान विभागाने दिली पावसाची तारीख
तसेच पुणे जिल्ह्यातून आमदार सुनील शेळके यांचे देखील नाव मंत्रिपदासाठी चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. या दोघांना कॅबिनेटमध्ये स्थान दिले जाऊ शकते. तर विदर्भातून आमदार राजू नवघरे यांनाही मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दुसरीकडे नरहरी झिरवळ यांच्यासह अनेक काही मंत्र्यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. झिरवळ हे दोन प्रकरणांमध्ये चर्चेत आले होते, त्यामुळे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.








