Shiv Sena Thackeray-MNS will come together;दोन ठाकरे एकत्र येण्याच्या हालचालींना वेग, मनसेकडून पहिली अट

Shiv Sena Thackeray-MNS will come together;The move to bring the two Thackerays together is gaining momentum, the first condition from MNS

bj admission
bj admission

 

 

 

मागील काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

 

आता दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सकारात्मक प्रतिक्रिया आणि सूचक विधानं केली जात आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशा अटकली बांधल्या जात आहेत.

 

अशात आता ठाकरे गटासोबत युती करण्यासाठी मनसेकडून पहिली अट टाकण्यात आल्याची एक्स्क्लुझिव्ह माहिती समोर आली आहे.

मनसेसोबत युती करायची असेल तर शिवसेना ठाकरे गटाने काँग्रेसची साथ सोडावी, अशी पहिली अट मनसेकडून टाकल्याची माहिती न्यूज १८ च्या हाती लागली आहे.

 

 

खात्रीशीर सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. मनसेनं टाकलेली अट शिवसेना ठाकरे गटाने मान्य केली तर राज्यात मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे.

 

ठाकरेंनी काँग्रेसची साथ सोडली तर महाविकास आघाडी अधिकृतपणे फुटणार आहे. त्यामुळे आता यावर ठाकरे गटाकडून काय निर्णय घेतला जाईल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

खरं तर, मागील काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहेत. अलीकडेच मनसे नेते अमित ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करत दोन्ही भावांनी फोनवरून संवाद साधावा, असं म्हटलं होतं.

 

यावर राऊतांनी देखील सूचक प्रतिक्रिया दिली. दोघांमध्ये फोनवरून संवादही झाला असेल, असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे शिवसेना ठाकरे-मनसेतील युतीवरील सस्पेन्स वाढला आहे.

 

आज मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी संजय राऊतांनी म्हटले की, ‘नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने कार्यकर्त्यांच मनोमिलन सुरू आहे.

 

सहकारी या विषयावर अत्यंत सकारात्मक असल्याने त्याचा परिणाम जमिनीवर कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं असेल, असे त्यांनी म्हटले.

 

मनसे नेते अमित ठाकरे यांनी युतीबाबत दोन भावांमध्ये चर्चा होईल, त्यावर आम्ही काही बोलणार नाही असे म्हटले होते. राज ठाकरे यांचा नंबर आदित्य आणि उद्धव ठाकरे यांच्याकडेदेखील आहे.

 

 

त्यामुळे एक फोन करायला हरकत नाही असे म्हटले होते. त्यावर संजय राऊत यांनी म्हटले की, ‘राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली देखील असेल.

 

तुम्हाला फळ दिसल्याचे कारण आहे ना…फळ येण्यासाठी आधी मेहनत घ्यावे लागते. त्यानंतर झाडावर फळ येते. युतीची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे सूचक वक्तव्य

 

संजय राऊत यांनी केले. दोन भावांमध्ये चर्चा होईल, पण या दोन भावांना फोनवर बोलण्यासाठी प्रस्तावाची गरज नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *