राजकारणात समीकरण बदलणार? CM फडणवीस, एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना

Will political equations shift? CM Fadnavis and Eknath Shinde rush to Delhi.

 

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर दिल्लीच्या वर्तुळात अचानक वेगवान राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत.

ना सुनावणी, ना वकील ट्रम्प करणार पुन्हा १८ हजार भारतीयांची हकालपट्टी

या राजकीय उलथापालथीचे पडसाद आता महाराष्ट्राच्या राजकारणातही तीव्रतेने उमटताना दिसत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अचानक झालेल्या दिल्ली दौऱ्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील घाईघाईने दिल्लीला रवाना झाले आहेत.

 

दिल्लीत पोहोचल्यानंतर एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या महत्त्वाच्या बैठकीमुळे महायुती सरकार आणि दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वात मोठ्या राजकीय खलबतांना उधाण आले आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत विद्यार्थ्यांचे सुरू असलेले आंदोलन आणि त्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेला राजीनामा यामुळे केंद्र सरकार आणि भाजप नेतृत्वावर मोठा राजकीय दबाव निर्माण झाला आहे.

मोठ्या नेत्याचा खळबळजनक दावा;अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच

याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील दोन्ही प्रमुख घटक पक्षांच्या नेत्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधीच दिल्लीत दाखल झाले असून त्यांनी पक्षश्रेष्ठींशी प्राथमिक चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

 

त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा निश्चित झाल्याने महायुतीच्या गोटात हालचाली तीव्र झाल्या आहेत.

ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका

या दौऱ्यात देवेंद्र फडवणीस एकनाथ शिंदे यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे.या बैठकीत अनेक निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा केंद्रीय मंत्रिमंडळात जागा मिळण्याची शक्यता आहे.

 

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांचा दिल्ली दौरा झाल्यामुळे विविध राजकीय अंदाज लावले जात आहेत.

कॉकरोच जनता पार्टीकडून उद्या 24 जुलै रोजी देशव्यापी आंदोलन

केंद्रीय मंत्रिमंडळात संभाव्य फेरबदल किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित काही मोठे निर्णय घेण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत ही चर्चा होत असल्याचे मानले जात आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला नियोजित नागपूर दौरा अचानक रद्द करत थेट दिल्ली गाठले आहे. पंढरपूरचा दौरा आटोपल्यानंतर मुख्यमंत्री नागपूरला रवाना होणार होते. मात्र, ऐनवेळी त्यांच्या दौऱ्यात मोठा बदल झाला असून ते अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत.

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांची दिल्लीत एक अत्यंत महत्त्वाची तातडीची बैठक पार पडणार आहे.

 

या अचानक ठरलेल्या बैठकीमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला असून, राज्य आणि केंद्राशी संबंधित काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कॉकरोज जनता पार्टी आणि आंदोलकांचा हा मोठा विजय मानला जात आहे.

 

अखेर कॉकरोज जनता पार्टीने आणि आंदोलकांनी जंतर मंतरवर विजय साजरा केला. नीट पेपरफुटीनंतर दिल्लीत जंतर मंतरवर महिन्याभरापासून आंदोलन सुरू होतं.

 

या लढ्याला अखेर यश मिळाल्याची प्रतिक्रिया अभिजित दिपके यांनी दिली आहे. तिकडे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि इतके राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

 

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी धडाधड ट्विट केले आहेत. तर दुसरीकडे तातडीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत.

 

Related Articles