नीट पेपरफुटी 47 अधिकाऱ्यांना केले बडतर्फ
47 officials dismissed over NEET paper leak.

कॉकरोच जनता पार्टीनं नवी दिल्लीतील जंतर मंतरवर नीट पेपरफुटीच्या मुद्यावरुन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरु केलं आहे. सीजेपी आणि सरकारमध्ये चर्चा देखील झाली आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून शिक्षण खात्यात मोठी कारवाई करण्यात येत आहे. काल शिक्षण खात्याच्या सचिवांना बदलण्यात आलं. आज नॅशनल टेस्टिंग एजन्सीतील 47 अधिकाऱ्यांना आज बडतर्फ करण्यात आलं.
एनटीएच्या या कारवाईवर अभिजीत दिपके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभिजीत दिपके यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर एक फोटो पोस्ट केला आहे, त्या फोटोत छोटा मासा आहे,
म्हणजेच एनटीएतील बडतर्फीची कारवाई ही छोट्या लोकांवर करण्यात आल्याचं सूचक वक्तव्य अभिजीत दिपके यांनी केलं आहे.
राजकारणात समीकरण बदलणार? CM फडणवीस, एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना
अभिजीत दिपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय माघार घेणार नसल्याचं म्हटलं आहे. सीजेपीच्या देशभरातील विद्यार्थी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सहभागी होत आहेत.
दुसरीकडे केंद्र सरकारनं काही पावलं उचललली आहेत. एनटीएतील 47 अधिकाऱ्यांवर थेट बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. तर, काल केंद्र सरकारकडून शिक्षण खात्यातील सचिवांना बदलण्यात आलं आहे.
आज नवी दिल्लीत नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून स्पेशल टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. अभिजीत दिपके यांनी एक्सवर छोट्या माशाचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या माध्यमातून दिपकेनं एनटीएच्या 47 अधिकाऱ्यांच्या बडतर्फीवर प्रतिक्रिया दिली आहे.
नीटसह इतर राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचं आयोजन करणाऱ्या एनटीएनं गैरप्रकारांबाबतची जबाबदारी निश्चित करण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. एनटीएनं 47 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नोकरीतून बडतर्फ केलं आहे.
राजकारणात समीकरण बदलणार? CM फडणवीस, एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना
पेपरफुटी आणि गैरप्रकारातील सहभागी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासोबत गुन्हे दाखल करण्याबाबत कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
शिक्षण मंक्षालयाच्या सूत्रांच्या नुसार परीक्षा पद्धतीत पारदर्शकतेबाबत समझोता करणाऱ्यांना दोषींना कोणत्याही किंमतीवर सोडलं जाणार नाही.
दोन जहाजांवर इराणचा हल्ला, पुण्यातील इंजिनिअरचा मृत्यू तर 10 जण जखमी
शिक्षण मंत्रालयाच्या अधिकृत सूत्रांनुसार बडतर्फीची कारवाई एनटीएचं प्रशासन आणि कामकाजाची रचना नव्यानं तयार केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून वादात अडकलेल्या एजन्सीच्या फेररचनेची कालमर्यादा निश्चित केली आहे.
सरकार पुढील एक महिन्यात एनटीएची कार्यप्रणाली, अधिकाऱ्यांची जबाबदारी, अंतर्गत व्यवस्थापन पूर्णपणे बदललं जाईल. या मोठ्या बदलानंतर प्रमुख उद्देश देशातील स्पर्धा परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि विश्वसनीय बनवणं आहे.








