कोट्यवधींची ‘डिफेंडर’ कार दिली मनोज जरांगेंना

Manoj Jarange gifted a 'Defender' car worth crores.

 

 

मराठा आरक्षण आणि कुणबी जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरुन उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा सध्या पश्चिम महाराष्ट्रात झंझावती दौरा सुरू आहे.

 

जरांगे पाटील यांच्याकडून सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर आणि मंत्र्‍यावर होत असलेल्या शिवराळ भाषेतील जेवढी चर्चा राजकीय वर्तुळात, समाज माध्यमांवर होत आहे.

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्षपदी बोर्डीकर, उपाध्यक्षपदी गोरेगावकर

त्याचप्रमाणे या दौऱ्यात दुसरी चर्चा सुरू आहे ती, जरांगे पाटील वापरत असलेल्या डिफेंडर गाडीची. पांढऱ्या रंगाची नवी कोरी डिफेंडर पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.

 

याबाबत स्वतः मनोज जरांगे यांनीही खुलासा करत ही गाडी आपल्याला वापरायला एका समाज बांधवांने दिल्याचं सांगितलं. आता, या डिफेंडर गाडीचे मालक सुभाष भोसले यांनी  संवाद साधला.

एनडीए आधाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष फुटणार? ; राजकारणात खळबळ!

मनोज जरांगे यांच्याकडे असलेली डिफेंडर ही आलिशान गाडी सांगोला तालुक्यातील चीक महूद येथील व्यापारी आणि प्रगतशील शेतकरी सुभाष भोसले यांनी दिली आहे.

 

मराठा समाजासाठी आंदोलने आणि उपोषणे करून मनोज दादांची तब्येत खूप खालावली आहे. त्यातच पुन्हा ते पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याचे समजल्यावर आपण डिफेंडर ही गाडी विकत घेतली होती

 

. या गाडीत पहिल्यांदा मनोज जरांगे यांनी बसावे ही आपली इच्छा असल्याने पंढरपूर येथील सरकोलीच्या सभेनंतर आपण त्यांना ही गाडी वापरण्यासाठी दिली. वास्तविक या गाडीत असणाऱ्या सुविधांमुळे मनोज जरांगे यांचा प्रवासातील त्रास कमी व्हावा ही आपली भावना होती,

खरी शिवसेना कोणाची आज सुप्रीम कोर्टात काय काय घडलं?निकाल लवकरच

असे भोसले यांनी सांगितले. आपल्या नवीन गाडीत देव बसावा ही इच्छा होती आणि आमच्या समाजासाठी मनोज जरांगे हे देवच आहेत, अशी भावनाही भोसले यांनी बोलून दाखवली.

 

डिफेंडर ही गाडी एक कोटी 90 लाख रुपयाची असून यासाठी दीड कोटीचे कर्ज भोसले यांनी घेतले आहे. घरात सराफाचा (सोने-चांदीचा) व्यवसाय असून शेतीही अतिशय अद्ययावत पद्धतीने करणारे भोसले बंधू यांची मनोज जरांगे यांच्यावर अतिव निष्ठा आहे.

सावजी मटण मुळे तुकाराम मुंडे अडचणीत

त्यातूनच, भोसले बंधूंनी ही गाडी त्यांना वापरासाठी दिली. सुरुवातीला जरांगे यांनी या आलिशान गाडीत बसण्यास नकार दिला होता. मात्र, सुभाष भोसले यांनी केलेल्या विनंतीनंतर

 

आता मनोज जरांगे यांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा या भोसलेंच्या डिफेंडर मधून सुरू आहे. या गाडीत त्यांना कमी त्रास होईल, अशी भोसलेंची भावना असून मनोज जरांगे यांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुखकर बनला आहे.

 

Related Articles